जान्हवी कपूरचा 'तो' फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 16:11 IST2019-02-25T16:04:11+5:302019-02-25T16:11:00+5:30

'धडक' सिनेमातून जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये जबरदस्त एंट्री घेतली आहे. 'धडक' सिनेमात जान्हवीचा अभिनय पाहुन प्रभावित झालेल्या करण जोहरने तिला त्याच्या आगामी सिनेमात साईन केले

Gunjan saxena biopic janhvi kapoor kick start shooting of film in lucknow | जान्हवी कपूरचा 'तो' फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल

जान्हवी कपूरचा 'तो' फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल

ठळक मुद्देजान्हवी कपूरने या सिनेमाची शूटिंग लखनऊमध्ये सुरु केली आहे या सिनेमाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहेत

 धडक सिनेमातून जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये जबरदस्त एंट्री घेतली आहे. धडक सिनेमात जान्हवीचा अभिनय पाहुन प्रभावित झालेल्या करण जोहरने तिला त्याच्या आगामी सिनेमात साईन केले. करण जोहरच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.    


जान्हवी कपूरने या सिनेमाची शूटिंग लखनऊमध्ये सुरु केली आहे. जान्हवीचे सेटवर फोटो सध्या व्हायरल होताना दिसतायेत. यात फोटोमध्ये जान्हवी पायलटच्या ड्रेसमध्ये दिसतेय.    


कारगिल युद्धात फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या गुंजन सक्सेना पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैनिकांवर निशाना साधण्यात येत असताना गुंजन यांनी आपल्या जीवाची बाजी लावत त्या भागातून विमान उडवत सैनिकांनी सुरक्षितरित्या त्या भागातून बाहेर काढले होते. अशा शूर महिलेची भूमिका जान्हवी मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.  या सिनेमाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहेत.


तख्त'बाबात बोलायचे झाले तर  हा सिनेमा औरंगजेब व दाराशिकोहच्या कथेवर आधारीत असणार आहे. २०२०मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात जान्हवी हिराबाई जैनाबादीची भूमिका करणार आहे. नुकतीच जान्हवी करण जोहरचा चॅट शो कॉफी विद करणमध्ये दिसली होती. यावेळी तिने तिच्या जीवनातील व करियरबाबत गोष्टी शेअर केल्या होत्या.

Web Title: Gunjan saxena biopic janhvi kapoor kick start shooting of film in lucknow