Gully Boy' Trailer: रणवीर सिंग व आलिया भटचा 'गली बॉय'मध्ये जबरदस्त अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 17:51 IST2019-01-09T17:50:40+5:302019-01-09T17:51:01+5:30
अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'गली बॉय'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

Gully Boy' Trailer: रणवीर सिंग व आलिया भटचा 'गली बॉय'मध्ये जबरदस्त अंदाज
अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'गली बॉय'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरला अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील रणवीरचा हिपहॉप अंदाज त्याच्या चाहत्यांना खूपच आवडला. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. डोळ्यात काजळ लावून रॅपच्या दुनियेत खळबळ उडवण्यासाठी रणवीर सज्ज झाला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रणवीर आणि आलियाच्या दमदार अभिनयाची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळते.
‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे. या चित्रपटासाठी रणवीर रॅपचे प्रशिक्षण घेतले आहे.
रणवीर सिंगने आतापर्यंत केलेल्या भूमिकांना योग्य न्याय दिला असून या भूमिकेला देखील तो न्याय देईल, असे ट्रेलर पाहिल्यावर जाणवते आहे. ट्रेलरमध्ये रणवीर अपना टाईम भी आयेगा असे सारखे बोलताना दिसतो आहे. हा ट्रेलर पाहून या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण धारावीमध्ये झाले असल्याचे लक्षात येते.
या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रणवीर व आलियाची जोडी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
रणवीर सिंगचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना भावतो का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.