Guess Who ? फोटोत दिसणारे दोन चिमुकले, आज बनले आहे बॉलिवूडमधील सुपरस्टार, ओळखा पाहू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 15:21 IST2021-03-13T15:21:28+5:302021-03-13T15:21:42+5:30
प्रसिद्ध अभिनेत्याचे डायहार्ट फॅन तुम्ही असाल तर या फोटोत त्याल ओळखणं तुमच्यासाठी फार कठीण काम नाही.

Guess Who ? फोटोत दिसणारे दोन चिमुकले, आज बनले आहे बॉलिवूडमधील सुपरस्टार, ओळखा पाहू
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि बडे कुटुंब म्हणजे खान कुटुंबीय. हिंदी चित्रपटसृष्टीत खान कुटुंब कायमच चर्चेत असतं. कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर चाहत्यांच्या नजरा असतात. या सर्वांमध्ये सा-यांचा लाडका आहे तो म्हणजे भाईजान समलान खान.
सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. सध्या अभिनेता सलमान खान त्याच्या कमिटमेन्ट पूर्ण करण्यात बिझी आहे. लवकरच 'राधे' सिनेमातून तो रसिकांच्या भेटीला येणार आहे. ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन त्याच्या प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खासच असतो.
त्याचा अभिनय, त्याचा डान्स, कॉमेडी आणि त्याच्या ना ना हरकती यावर रसिक फिदा आहेत. त्यामुुळेच सलमानचे कित्येक फॅन्स त्याच्यावर अक्षरशा जीव ओवाळून टाकतात. त्यामुळे आपल्या या लाडक्या स्टारविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते.
त्याच्याविषयीच्या विविध बारीकसारीक गोष्टींमध्ये रसिकांना रस असतो. त्यातच या लाडक्या स्टारचे जुने फोटो पाहायला मिळाले तर क्या बात. सध्या सलमानचे असेच काही जुने फोटो व्हायरल होत आहेत. यात एक जुना ग्रुप फोटो समोर आला आहे. यात सलमान भाऊ अरबाज खानसह दिसत आहे.
सलमानचे खरेखुरे किंवा डायहार्ट फॅन तुम्ही असाल तर या फोटोत सलमानला ओळखणं तुमच्यासाठी फार कठीण काम नाही. हा फोटो जवळपास ३५ ते ४० वर्षे जुना असल्याचे फोटोच्या प्रिंटवरुन तुम्हाला लक्षात येईल. सलमानचा जुना फोटो समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
याआधी काही दिवसांपूर्वी खुद्द सलमान खानने सोशल मीडियावर त्याचा बालपणीचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत सलमानसह त्याचे भाऊबहिण पाहायला मिळाले. खान बंधू भगिनीचा हा बालपणीचा फोटो रसिकांना चांगलाच भावला. अल्पावधीतच या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु झाला.
आता आणखी एका अशाच सलमानच्या जुन्या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आम्ही तर या फोटोत सलमानला ओळखले आहे, आता तुम्हीसुद्धा ओळखा पाहू यातील सलमान खान कुठे आहे ?