‘ग्रेट ग्रँड मस्ती’ची टीम ‘लई जोरात’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 22:04 IST2016-07-15T14:37:24+5:302016-07-15T22:04:02+5:30
रूपाली मुधोळकर ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ची संपूर्ण स्टार कास्टने आज चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नागपूरच्या लोकमत कार्यालयाला भेट दिली. ‘बँजो मॅन’रितेश ...
‘ग्रेट ग्रँड मस्ती’ची टीम ‘लई जोरात’!!
‘ग्रेट ग्रँड मस्ती’ची संपूर्ण स्टार कास्टने आज चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नागपूरच्या लोकमत कार्यालयाला भेट दिली. ‘बँजो मॅन’रितेश देशमुख, चॉकलेटी बॉय आफताब शिवदासानी, हँडसम अॅण्ड जॉयफुल विवेक ओबेरॉय शिवाय मोस्ट ब्युटिफुल उर्वशी रौतेला यांनी यावेळी ‘सीएनएक्स डिजिटल डॉट कॉम‘शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
फोटो : राजेश टिकले
‘ग्रेट ग्रँड मस्ती’ आज रिलीज झाला. बॉक्स आॅफिसवर चित्रपटाला समाधानकारक ओपनिंग मिळू शकली नाही. मात्र ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ची संपूर्ण टीम चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साही दिली. ‘आज तो पहिला दिन है..फिल्म लोगों को जरूर पसंद आयेंगी..’असे सर्वांनी अगदी आत्मविश्वासाने सांगितले. रिव्ह्यू काही असोत, ओपनिंग कमी असो..आम्ही समीक्षकांच्या मताचा आदर करतो. पण ‘मस्ती’ सीरिजमधील ही तिसरी फिल्मही चाहत्यांना नक्की आवडेल, असे रितेश म्हणाला. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’म्हणजे अॅडल्ट हॉरर कॉमेडी आहे. पहिल्यांदा हॉरर कॉमेडी लोकांना पाहायला मिळणार आहे, हेच चित्रपटाचे नावीण्य आहे, असे विवेकने सांगितले.
........................
गरमा गरम साबुदाणा वडे...
‘लय भारी’तला माऊली म्हणजेच रितेश देशमुख आज नेमक्या आषाढी एकादशीच्या दिवशी ‘ग्रेट ग्रँड मस्ती’च्या संपूर्ण टीमसह ‘लोकमत’च्या नागपूर कार्यालयात आला. आज उपवास धरला आहेस का? असा पहिलाच अनौपचारिक प्रश्न रितेशला विचारण्यात आला. यावर रितेश मनमोकळा हसला. घरी असतो तर कदाचित धरला असता, पण आता फिरस्तीवर असल्याने शक्य नाही, असे तो म्हणाला. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतानाच, आजचा दिवस म्हणजे घरी उपवासाच्या पदार्थांची रेलचेल असते. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, भगर हे सगळे उपवासाचे पदार्थ मला जाम आवडतात, हे सांगायलाही तो विसरला नाही. मग काय, रितेशला साबुदाणा वडा आवडतो म्हटल्यावर गरमागरम साबुदाणा वड्यांचा नास्ता रितेश व ‘ग्रेट ग्रँड मस्ती’च्या अख्ख्या टीमसमोर हजर करण्यात आला. गरमा गरम साबुदाणा वडे समोर पाहून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटले नसेल तर नवल!!
..............................