​'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' अ‍ॅडल्ट फिल्मचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 16:16 IST2016-06-17T10:34:32+5:302016-06-17T16:16:24+5:30

रितेश देशमुख, विवेक आॅबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या मुख्य भूमिकेचा ‘गे्रेट ग्रॅँड मस्ती’ या अ‍ॅडल्ट चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

'Great Grand Masti' Adult Movie Trailer Release | ​'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' अ‍ॅडल्ट फिल्मचा ट्रेलर रिलीज

​'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' अ‍ॅडल्ट फिल्मचा ट्रेलर रिलीज

तेश देशमुख, विवेक आॅबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या मुख्य भूमिकेचा ‘गे्रेट ग्रॅँड मस्ती’ या अ‍ॅडल्ट चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. 

या चित्रपटात ‘थ्रिल’ व सेक्सी भूतदेखील पाहावयास मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे या चित्रपटात एक दोन नव्हे तर तब्बल पाच ते सहा अभिनेत्री आपल्या बोल्डनेसचा जलवा दाखविणार आहेत. श्रद्धा दास, मिष्टी, पूजा चोप्रा आणि सोनल चौहान आणि पूजा बोस या पाच अभिनेत्री झळकणार आहेत. तर अभिनेत्री उर्वशी रौतेला सेक्सी भूताच्या रुपात ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतेय.

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे या सिनेमातील सरप्राइज पॅकेज असणारेय. येत्या 22 जुलै रोजी 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' सिनेमा बॉक्स आॅफिसवर दाखल होतोय.

Web Title: 'Great Grand Masti' Adult Movie Trailer Release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.