"बाबांसारखं काही करु नको.."; गोविंदाच्या पत्नीने लेकाला स्पष्टच सांगितलं, यशवर्धन करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:02 IST2025-06-18T17:01:15+5:302025-06-18T17:02:19+5:30

गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा यांनी लेकाविषयी खास मत व्यक्त केलंय. याशिवाय बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी लेकाला खास सल्ला दिला आहे

Govinda's wife sunita ahuja advice to her son not doing mimicry of father | "बाबांसारखं काही करु नको.."; गोविंदाच्या पत्नीने लेकाला स्पष्टच सांगितलं, यशवर्धन करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

"बाबांसारखं काही करु नको.."; गोविंदाच्या पत्नीने लेकाला स्पष्टच सांगितलं, यशवर्धन करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

गोविंदा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. गोविंदाला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. गोविंदाच्या विनोदी टायमिंगचे सर्वजण चाहते आहेत. गोविंदाचा लेक यशवर्धन हा सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत असतो. यशवर्धनही लवकरच बॉलिवूड पदार्पण करण्यास उत्सुक आहे. अशातच गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने यशवर्धनला खास सल्ला दिलाय. "बाबांसारखं बनू नको", अशा शब्दात सुनीता यांनी लेकाला सांगितलं आहे. जाणून घ्या.

सुनिता यांनी ETimes सोबत केलेल्या मुलाखतीत याविषयी स्पष्ट केले की, “माझ्या मुलाची गोविंदाशी तुलना होऊ नये. यशवर्धनने स्वतःची शैली विकसित करायला हवी. मी त्याला ‘गोविंदाची नक्कल करू नको’ असं सांगितलं. त्याचं यश त्याने स्वतःच्या नावावर मिळवायला हवं. तो खूप मेहनत करतो, गुणवान आहे. तो चांगला डान्स करतो आणि अभिनयाविषयी तो जबाबदारीने काम करतो. यशवर्धनला खूप लवकर अर्थात पुढच्या वर्षी आपण मोठ्या पडद्यावर पाहू, अशी मला आशा आहे.”

Govinda celebrates son Yashvardhan Ahuja

बॉलिवूडचे प्रसिद्ध ‘कॉमिक किंग’ गोविंदा आणि सुनिता अहुजा यांचा मुलगा यशवर्धन अहुजा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज आहे. त्याच्या आगामी भूमिकेबाबत यशवर्धन सध्या ट्रेनिंग घेत आहे. यशवर्धनचे डान्स व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यशवर्धनला मोठ्या पडद्यावर पाहण्यास त्याचे आणि गोविंदाचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान गोविंदाही कोणत्या नवीन सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Web Title: Govinda's wife sunita ahuja advice to her son not doing mimicry of father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.