Shocking...! गोविंदाच्या जवळच्या मित्रांचा खुलासा, राजाबाबू मानसिकदृष्ट्या अस्थिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 20:31 IST2019-08-02T20:30:43+5:302019-08-02T20:31:01+5:30
गोविंदाला मदतीची गरज असल्याचे देखील त्याच्या मित्रांनी म्हटले आहे

Shocking...! गोविंदाच्या जवळच्या मित्रांचा खुलासा, राजाबाबू मानसिकदृष्ट्या अस्थिर
आपल्या डान्सिंग व अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अभिनेता गोविंदा यांने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला होता. सिनेइंडस्ट्रीतील काही चित्रपटांबद्दल सांगितलं. त्याने अशा काही गोष्टींचा खुलासा केला.जे ऐकून सगळे हैराण झाले. गोविंदाच्या वक्तव्यामुळे ट्रोल करण्यात आले. नेटकऱ्यांनी तर मीम्सद्वारे गोविंदावर निशाणा साधला होता. दरम्यान गोविंदाच्या मित्रांनी तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्याला मदतीची गरज असल्याचे देखील म्हटले आहे.
इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानूसार गेल्या काही दिवसांपासून गोविंदाच्या वर्तवणूकीत बदल झाला आहे. तो प्रत्येक चित्रपटाची ऑफर त्याने नाकारल्याचे म्हणत आहे.
गोविंदाच्या या नकारात्मक वागण्यामुळे कित्येक डिस्ट्रीब्यूटरने त्याच्या ‘रंगीला राजा’ चित्रपटाला नकार दिला होता. इतकच नव्हे तर गोविंदाने त्याच्या मित्रांसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. त्यामुळे आज बॉलिवूडमध्ये गोविंदाचा एकही मित्र राहिला नाही.
गोविंदाने मुलाखतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. त्यात गोविंदा म्हणाला की, त्याने २००९ साली प्रदर्शित झालेला चित्रपट अवतारला शीर्षक दिलं होतं.
तसेच त्याने सांगितलं की, या चित्रपटाची ऑफरही त्याला देण्यात आली होती. फक्त हेच नाही तर गोविंदाने सांगितले की, गदर, चाँदनी, ताल व देवदास यांसारख्या चित्रपटांची ऑफर दिली होती. पण त्याने रिजेक्ट केला.