बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारनं मानधन म्हणून घेतल्या होत्या फक्त 'एक डझन केळी आणि एक नारळ'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:41 IST2025-10-16T14:41:35+5:302025-10-16T14:41:54+5:30
बॉलिवूडचा एक सुपरस्टार आहे, ज्यानं एक चित्रपट केवळ एक डझन केळी आणि एक नारळ एवढ्याच मोबदल्यात साइन केला होता.

बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारनं मानधन म्हणून घेतल्या होत्या फक्त 'एक डझन केळी आणि एक नारळ'!
बॉलिवूडच्या दुनियेत असे अनेक किस्से आहेत, जे ऐकून विश्वासच बसत नाही. कोट्यवधींची फी घेणारे काही दिग्गज कलाकारांनी कधी-कधी फक्त थोड्याशा मोबदल्यात काम केल्याचंही ऐकायला मिळतं. बॉलिवूडचा असाच एक सुपरस्टार आहे. ज्यानं एक चित्रपट केवळ एक डझन केळी आणि एक नारळ एवढ्याच मोबदल्यात साइन केला होता. हा अभिनेता नेमका कोण? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
तर तो अभिनेता आहे बॉलिवूडचा 'हिरो नंबर १' अर्थात गोविंदा. नुकतंच गोविंदा अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या टॉक शो 'टू मच'मध्ये अभिनेता चंकी पांडेसोबत सहभागी झाला होता. यावेळी अभिनेत्यानं त्याच्या इंडस्ट्रीतील सुरुवातीच्या काळावर भाष्य केलं. गोविंदानं म्हटलं की, अभिनेता म्हणून त्याची ओळख होण्यामध्ये त्याच्या डान्सचा मोठा वाटा आहे. त्याला जरी प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी शिकवले असले तरी, त्याची स्वत:ची खास शैली निर्माण करण्याची संधी त्याला कमल मास्टरजी यांनी दिली. गोविंदा म्हणाला, "कमल मास्टरजींनी मला न बोलता कसे नाचायचे हे दाखवले. त्यामुळे ते जे काही सांगायचे, शब्द काहीही असोत, त्यानुसार गाण्यावर डान्स केला जायचा. हे सर्व कमल मास्टरजींपासून सुरू झाले".
गोविंदाला आपल्या डान्सच्या कलेमुळेच एक मोठा ऋण फेडण्याची संधी मिळाली होती. गोविंदाने सांगितले की, एका वेळी निर्माते सुबीर मुखर्जी यांच्या आईने गोविंदाच्या आईला मदत केली होती. अनेक वर्षांनंतर, जेव्हा सुबीर मुखर्जी यांनी गोविंदाला त्यांच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली, तेव्हा कोणतेही पैसे न घेता, काम करून ते ऋण फेडण्याची संधी गोविंदा मिळाली. गोविंदाने त्यावेळी आपली फी म्हणून केवळ एक डझन केळी आणि एक नारळ मागितला होता.
समंथा फॉक्ससोबत मिळाली डान्सची संधी
विशेष म्हणजे, याच चित्रपटातील एका गाण्यामध्ये जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली गायिका समंथा फॉक्स (Samantha Fox) दिसणार होती. गाणे सुरू झाल्यावर समंथाला पाहून गोविंदा पूर्णपणे थक्क झाला. दरम्यान, "रॉक डान्सर' या चित्रपटात गोविंदा आणि समंथा फॉक्सचं गाणं होतं. हा मेमन रॉय दिग्दर्शित १९९५ चा हिंदी संगीतमय थ्रिलर चित्रपट होता. त्यात कमल सदनाह, रोनित रॉय, रितू शिवपुरी, जावेद जाफरी आणि शेरॉन प्रभाकर प्रमुख पात्र होती.