हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:19 IST2025-06-23T16:18:36+5:302025-06-23T16:19:00+5:30

व्हिडिओत छोटी मुलगी अनकम्फर्टेबल झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

govinda rests her head on girl s shoulder sitting beside him in a plane netizens says creepy | हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

अभिनेता गोविंदा (Govinda) गेल्या वर्षांपासून सतत चर्चेत आहे. त्याच्या करियरला उतरती कळा आली आहे. त्यातच मधल्या काळात स्वत:च्याच बंदुकीतून त्याच्या पायाला गोळी लागली होती म्हणून तो चर्चेत आला. यानंतर पत्नी आणि त्याचा घटस्फोट होत असल्याचंही बोललं गेलं होतं. एकूणच गोविंदा सध्या प्रोफेशनल नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळेच प्रसिद्धीझोतात आहे. आता त्याचा विमानातील एक व्हिडिओ व्हायरल होतो. व्हिडिओ पाहून अनेकांना अक्षरश: किळस वाटत आहे. नक्की काय घडलं पाहा

६१ वर्षीय अभिनेता गोविंदाचा लूक सध्या बदललेला दिसतोय. डोक्यावर विग,मिशी आणि गॉगल असा त्याचा लूक आहे. तो विमानात बसला असून त्याच्या बाजूला एक छोटी मुलगी बसली आहे. गोविंदा सेल्फी व्हिडिओ घेत आहे. हळूहळू तो त्याचं डोकं बाजूच्या छोट्या मुलीच्या खांद्यावर ठेवताना दिसतोय. मग कॅमेऱ्यात बघून विचित्र हसताना दिसतोय. त्या मुलीला ही जराही कल्पना दिसत नाहीए की हा अभिनेता आहे. तसंच ती अनकम्फर्टेबल झाल्याचंही स्पष्ट दिसत आहे. रेडिट सोशल मीडियावर साईटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Govinda in a flight
byu/DyausPater inBollyBlindsNGossip

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी गोविंदाला ट्रोल केलं आहे. 'हे काय करतोय?', 'ही मुलगी कोण आहे?'.'विचित्र', 'हद कर दी आपने', 'हा फारच किळसवाणा प्रकार आहे' अशा कमेंट्स व्हिडिओवर आल्या आहेत. 

गोविंदाचा हा व्हिडिओ खरा आहे की फेक आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र गोविंना त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर त्याच्या नवीन लूकमधले फोटो, व्हिडिओ शेअर केलेत. तोच लूक या व्हायरल  व्हिडिओतही असल्याने हा व्हिडिओ खरा असण्याचीही शक्यता आहे. 

Web Title: govinda rests her head on girl s shoulder sitting beside him in a plane netizens says creepy