गोविंदा आर्थिक संकटात? अभिनेत्याच्या दिवाळखोरीच्या चर्चांवर भाच्याने दिलं स्पष्टीकरण; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 17:45 IST2026-02-19T17:44:42+5:302026-02-19T17:45:28+5:30
गोविंदा एकेकाळचा सुपरस्टार आहे, त्याची अशी हालत का होईल?

गोविंदा आर्थिक संकटात? अभिनेत्याच्या दिवाळखोरीच्या चर्चांवर भाच्याने दिलं स्पष्टीकरण; म्हणाला...
बॉलिवूडमध्येगोविंदा वेगळ्याच कारणाने सध्या चर्चेत असतो. कधी त्याची पत्नी सुनिता आहुजा त्याच्यावर गंभीर आरोप करते तर कधी त्याला घरातच बंदुकीची गोळी लागते. गोविंदा बऱ्याच काळापासून स्क्रीनवरही दिसलेला नाही. त्यातच आता गोविंदा दिवाळखोर झाल्याच्याही बातम्या आल्या. यावर नुकतंच त्याचा भाचा विनय आनंद याने उत्तर दिलं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
गोविंदा आर्थिक संकटाचा सामना करतोय अशा बातम्या आल्या होत्या. यावर एका मुलाखतीत त्याचा भाचा विनय आनंद म्हणाले, "गोविंदा सुपरस्टार आहे. आजही तो जिथे जाईल तिथे २५ ते ३० लाख आरामात कमावेल. जे लोक त्याला गरीब म्हणत आहेत ते वेडे आहेत. गोविंदा रस्त्यावर आलाय असं लोक लिहित आहेत. त्याच्यासोबत जे घडायचं ते घडून गेलं. अरे वेड्यांनो, कुठे आहात, काय फालतु बडबड ककत आहात. तो ९० च्या दशकाचा सुपरस्टार आहे जो लाखात कमावतोय."
गोविंदा करिअपमध्ये उच्च शिखरावर होता. त्याबद्दल सांगताना विनय आनंद म्हणाले, "जेव्हा लोखंडवालामध्ये १२ तो १३ लाखात फ्लॅट येत होता तेव्हा गोविंदा एका सिनेमासाठी १ कोटी रुपये घ्यायचा. तो रस्त्यावर कसा येईल? ७० ते ८० त्या दशकात सिनेमे केल्यानंतर ५ चित्रपटांमधून त्याने जितकं कमावलं ते कदाचितच कोणी कमावलं असेल. सध्या असे किती सुपरस्टार्स असतील ज्यांच्याकडे आज पैसेच नसतील. आपल्या देशात कसे लोक आहेत हे पाहून मला विचित्रच वाटतं. मीडिया पब्लिसिटीसाठी कशाप्रकारच्या गोष्टी लिहित आहे. मी सोशल मीडिया उघडलं तर मला गोविंदा दिसत आहे. यार, हे कसलं स्टारडम आहे?"