"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 10:50 IST2025-08-28T10:49:00+5:302025-08-28T10:50:09+5:30

Sunita Ahuja Rejects Divorce With Govinda: सुनीता आहुजाने गोविंदासोबत घटस्फोटाच्या वृत्तांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. तिने म्हटले की, कोणीही तिला आणि गोविंदाला वेगळे करू शकत नाही.

''Govinda is only mine, no one else is with us...'', Sunita Ahuja puts an end to the divorce talks | "गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम

"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम

गेल्या काही दिवसांपासून सुनीता आहुजा(Sunita Ahuja)ने बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा(Govinda)विरुद्ध घटस्फोटाची याचिका दाखल केल्याचे बोलले जात होते. पण गणेश चतुर्थी एकत्र साजरी करून, गोविंदा आणि सुनीता यांनी घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम लावला आहे. दोघांनीही एकत्र गणपती बाप्पाची पूजा केली आणि पापाराझींना मिठाई वाटतानाही दिसले. आता सुनीता यांनी स्वतः एक विधान देऊन स्पष्ट केले आहे की तिच्या आणि गोविंदाच्या घटस्फोटाची बातमी खोटी आहे.

सुनीता आहुजाने एएनआयशी बोलताना घटस्फोटाच्या बातमीबद्दल सांगितले. ती म्हणाली की, ''आज आम्ही इतके जवळ होतो. जर काही झाले असते किंवा आमच्यात दुरावा असता तर आम्ही इतके जवळ असतो का? कोणीही आम्हाला वेगळे करू शकत नाही, जरी कोणी वरून आले तरी, देव आला, अगदी शैतानही आला तरी कोणीही आम्हाला वेगळे करू शकत नाही.''

'माझा गोविंदा फक्त माझा आहे'
सुनीता आहुजा पुढे म्हणाली, ''मेरा पती सिर्फ मेरा' है' हा चित्रपट होता, त्याचप्रमाणे माझा गोविंदा फक्त माझा आहे आणि इतर कोणाचाही नाही. कृपया आम्ही काही सांगत नाही तोपर्यंत उगाच काहीही बोलू नका.''

गोविंदाने म्हटले होते
यापूर्वी गोविंदाने प्रसारमाध्यमांशी बोलताना असेही म्हटले होते की, तो नेहमीच एकत्र राहण्याची प्रार्थना करतो. तो म्हणाला होता की, ''ज्यांच्यावर बाप्पा गणेशाचा आशीर्वाद असतो, प्रथम देवाची कृपा होते आणि कुटुंबातील संकटे दूर होतात, दुःखे आणि अडथळे दूर होतात आणि आपण समाजासोबत एकत्र राहू शकतो. तुम्हीही एकत्र राहावे अशी मी प्रार्थना करतो. आम्ही एकत्र राहावे ही तुमची शुभेच्छा आहे.'

Web Title: ''Govinda is only mine, no one else is with us...'', Sunita Ahuja puts an end to the divorce talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.