मुलगा यशवर्धनच्या करिअरसाठी काहीच केलं नाही? पत्नीच्या आरोपावर गोविंदा म्हणाला, "राजकारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:23 IST2026-02-10T16:22:16+5:302026-02-10T16:23:36+5:30

मुलाच्या करिअरसाठी काहीच केलं नाही..., पत्नीने लावलेला आरोप

govinda clears rumour of him not getting involved in son yashvardhan s career on allegations made by wife sunita ahuja | मुलगा यशवर्धनच्या करिअरसाठी काहीच केलं नाही? पत्नीच्या आरोपावर गोविंदा म्हणाला, "राजकारण..."

मुलगा यशवर्धनच्या करिअरसाठी काहीच केलं नाही? पत्नीच्या आरोपावर गोविंदा म्हणाला, "राजकारण..."

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील कौटुंबिक कलह काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. सुनीता आहुजाने मागील काही मुलाखतींमध्ये गोविंदावर गंभीर आरोप केले असून, यामुळे चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः मुलगा यशवर्धनच्या करिअरवरून दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. लेकाच्या करिअरसाठी गोविंदाने काहीच केले नाही असं ती म्हणाली. लेकाच्या करिअरवरुन आता गोविंदाने उत्तर दिलं आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा म्हणाला, "माझ्या राजकीय प्रवासाचा मुलांच्या भविष्यावर वाईट परिणाम होऊ नये, म्हणूनच मी राजकारण सोडले होते. यशवर्धसाठी मी साजिद नाडियाडवालाशी बोलून यशला फिल्ममेकिंगचे बारकावे शिकण्यासाठी मार्गदर्शन मिळवून दिले होते. मुलाला चित्रपटसृष्टीतील कामाचा अनुभव मिळावा यासाठी मीही प्रयत्न केला."

नव्या चित्रपटाची चर्चा आणि भविष्यातील वाटचाल एकीकडे पती-पत्नीमधील हा वाद चर्चेत असतानाच, यशवर्धन आहुजाच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबाबत सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक साजिद खान आपल्या आगामी चित्रपटात यशवर्धनला मुख्य भूमिकेत घेण्याची शक्यता आहे. सुनीताने गोविंदाच्या आजूबाजूच्या लोकांवरही टीका केली असून, त्यांच्यामुळे गोविंदाचे करिअर खराब झाल्याचे म्हटले आहे. आता या वादावर पडदा पडणार की हे आरोप-प्रत्यारोप सुरूच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : गोविंदा ने बेटे के करियर पर पत्नी के आरोपों का जवाब दिया, राजनीति का हवाला दिया।

Web Summary : गोविंदा ने अपनी पत्नी सुनीता के उन आरोपों का जवाब दिया है कि उन्होंने अपने बेटे यशवर्धन के करियर की उपेक्षा की। उन्होंने दावा किया कि उन्होंने राजनीति छोड़कर अपने बच्चों के भविष्य को प्राथमिकता दी और यशवर्धन को साजिद नाडियाडवाला से फिल्म निर्माण में मार्गदर्शन दिलाया। यशवर्धन साजिद खान की अगली फिल्म में डेब्यू कर सकते हैं।

Web Title : Govinda Addresses Wife's Claims About Son's Career, Cites Politics.

Web Summary : Govinda responds to his wife Sunita's accusations that he neglected their son Yashvardhan's career. He claims he prioritized his children's future by leaving politics and secured Yashvardhan guidance from Sajid Nadiadwala in filmmaking. Yashvardhan may debut in Sajid Khan's next film.