विद्या बालनच्या फॅन्ससाठी एक खूशखबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 14:58 IST2017-10-11T09:28:43+5:302017-10-11T14:58:43+5:30

विद्या बालन सध्या आपला आगामी चित्रपट तुम्हारी सुलुच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे पोस्टर, टीजर आणि ट्रेलर याआधीचे रिलीज ...

A good news for Vidya Balan's fans | विद्या बालनच्या फॅन्ससाठी एक खूशखबर

विद्या बालनच्या फॅन्ससाठी एक खूशखबर

द्या बालन सध्या आपला आगामी चित्रपट तुम्हारी सुलुच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे पोस्टर, टीजर आणि ट्रेलर याआधीचे रिलीज करण्यात आले आहे. मात्र आता या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. विद्या बालनच्या फॅन्ससाठी एक खूशखबरी आहे. हा चित्रपट ठरवलेल्या डेटच्या आधीच रिलीज करण्यात येणार आहे. आधी हा चित्रपट 24 नोव्हेंबरला रिलीज होणार होता. मात्र आता असे कळते आहे की हा चित्रपट 17 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी हा चित्रपट 1 डिसेंबरला रिलीज होणार होता. त्यानंतर मेकर्सनी यांची डेट 24 नोव्हेंबर केली आता असे कळते आहे की चित्रपटाची रिलीज डेट आणखीन जवळ करुन 17 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.   

तुम्हारी सुलू या चित्रपटाची कथा सुलु या स्त्रीच्या अवतीभवती फिरणार आहे. सुलु ही व्यक्तिरेखा विद्या बालन साकारणार असून ती या चित्रपटात आरजेच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सुलु रात्रीच्या शोंचे सूत्रसंचालन करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. यापूर्वी ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात विद्या आरजेच्या भूमिकेत दिसली होती. आयुष्यात स्वातंत्र्य मिळवू इच्छिणाºया वा स्वतंत्र अस्तित्व असलेल्या महिलेच्या भूमिकेत विद्या यात दिसू शकते.  तुम्हारी सुलु या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेदी करत असून या चित्रपटात नेहा धुपिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ALSO READ : विद्या बालनसोबत लोकलमध्ये घडला होता ‘हा’ किळसवाणा प्रकार!

विद्याला या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. कारण याआधी रिलीज झालेला विद्याचा बेगम जान चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. त्यामुळे विद्याला सध्या एका हिटची गरज आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. त्यामुळे चित्रपट ही प्रेक्षकांना आवडले अशी आशा विद्याला आहे. विद्याने परिणीती चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र तिच्या अभिनयाचे समीक्षकांकडून कौतुक करण्यात आले. 

Web Title: A good news for Vidya Balan's fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.