श्रद्धा कपूरसाठी गुड न्यूज; फेसबुकवर १.५ कोटी फॉलोअर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 20:34 IST2017-02-10T15:04:30+5:302017-02-10T20:34:30+5:30
बॉलिवूडची ‘नेक्स्ट सुपरस्टार’ म्हणून बघितल्या जात असलेल्या अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा सोशल मीडियावरही बोलबाला वाढला आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक ...
श्रद्धा कपूरसाठी गुड न्यूज; फेसबुकवर १.५ कोटी फॉलोअर्स
ब लिवूडची ‘नेक्स्ट सुपरस्टार’ म्हणून बघितल्या जात असलेल्या अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा सोशल मीडियावरही बोलबाला वाढला आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक फॅन्स संख्या असलेल्या सेलिब्रेटींना ती जोरदार टक्कर देत असून, फेसबुकवर तिच्या फॉलोअर्सची संख्या १.५ कोटी इतकी झाली आहे. फेसबुकच्या या आकड्यांमुळे श्रद्धा भलतीच खूश असून, फॅन्सचे तिने आभारही मानले आहेत.
श्रद्धाने लिहिले की, ‘लोकांचे हे प्रेम बघून मी खूपच भारावून गेली आहे. मी या सर्वांवर इतके प्रेम करतेय की, मला ते शब्दात सांगता येत नाही’ अशा शब्दात तिने तिच्या फॉलोअर्सचे आभार मानले आहेत. ‘आशिकी-२’ मध्ये आपल्या निरागसतेने प्रेक्षकांचे मने जिंकणारी श्रद्धा सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह आहे. तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी बोलायला प्रचंड आवडते. तिला जेव्हा-केव्हा संधी मिळतेय, ती फॅन्सबरोबर चॅटच्या माध्यमातून कनेक्ट असते.
![]()
श्रद्धा सध्या अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम याची बहीण हसिना पारकर हिच्या जीवनावर आधारित बायोपिकची शूटिंग करण्यात व्यस्त आहे. श्रद्धाच्या आतापर्यंतच्या करिअरचा विचार केल्यास तिने खूपच निरागस आणि रोमॅण्टिक भूमिका साकारलेल्या आहेत. प्रथमच ती हसिना पारकरच्या भूमिकेत झळकणार आहे. तिची ही भूमिका अतिशय बोल्ड आणि दमदार समजली जात आहे. ‘मुंबईची राणी’ असे संबोधल्या जाणाºया हसिनाच्या भूमिकेसाठी श्रद्धाने खूप मेहनत घेतली असल्याचे समजते. या सिनेमाचे दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी केले आहे, तर सिनेमात श्रद्धाचा भाऊ सिद्धार्थ ‘दाऊद’च्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे.
नुकतेच या सिनेमाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले असून, त्यास तुफान लाइक्स मिळत आहे. पोस्टरमध्ये श्रद्धाने गोल्डन लाइनचा काळ्या रंगाचा सूट परिधान केलेला आहे, तर तिचे डोळे खूपच इंटेंस असल्याचे बघायवास मिळत आहेत. या पोस्टरला शेअर करताना अपूर्वने म्हटले होते की, ‘राणी शहरात आलेली आहे.’ या सिनेमासाठी सुरुवातीला सोनाक्षी सिन्हा हिला आॅफर देण्यात आली होती. मात्र तिने नकार दिल्याने ही भूमिका श्रद्धाच्या पदरात पडली. श्रद्धासोबत सिनेमात शर्मन जोशी पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे, तर अंकुर भाटिया हसिना पारकरच्या पतीच्या भूमिकेत असेल. श्रद्धाच्या या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून, फॉलोअर्सची संख्या वाढविण्यात हा सिनेमा तितकाच कारणीभूत ठरत असल्याचे समजते.