Good News! ‘गोरी मेम’ सौम्या टंडनकडे येणार नवा पाहुणा, शेअर केलेत बेबी बम्पचे फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 10:49 IST2018-11-14T10:47:31+5:302018-11-14T10:49:54+5:30
होय,सौम्या टंडन प्रेग्नंट असून लवकरच तिच्या घरी एक नवा पाहुणा येणार आहे. सौम्याने सोशल मीडियावर आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत, ही गुड न्यूज दिली आहे.

Good News! ‘गोरी मेम’ सौम्या टंडनकडे येणार नवा पाहुणा, शेअर केलेत बेबी बम्पचे फोटो!!
ठळक मुद्देडिसेंबर २०१६ मध्ये सौम्याने बँक अधिकारी सौरभ देवेन्द्र सिंहसोबत लग्न केले होते. येणारे बाळ या जोडप्याचे पहिले अपत्य असणार आहे. साहजिकचं सौम्या सध्या जाम आनंदात आहे.
इम्तियाज अलीच्या ‘जब वुई मेट’मध्ये करिना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारणारी आणि ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेने घराघरात पोहोचलेली अनिता भाभी अर्थात सौम्या टंडनने एक गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. होय,सौम्या टंडन प्रेग्नंट असून लवकरच तिच्या घरी एक नवा पाहुणा येणार आहे. सौम्याने सोशल मीडियावर आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत, ही गुड न्यूज दिली आहे.
सौम्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यात तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसतोय. ‘आज झोपेतून उठले आणि मला काहीसा जादुई अनुभव आला. मी जणू ‘सुपरहिरो विदआऊट कॅप’ आहे. मी गर्भवती आहे आणि हा प्रत्येक क्षण मी जगतेय. आपल्या शुभेच्छांची गरज आहे,’ असे सौम्याने लिहिले आहे.
डिसेंबर २०१६ मध्ये सौम्याने बँक अधिकारी सौरभ देवेन्द्र सिंहसोबत लग्न केले होते. येणारे बाळ या जोडप्याचे पहिले अपत्य असणार आहे. साहजिकचं सौम्या सध्या जाम आनंदात आहे. सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धी मिळाली.