राधिका आपटेच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज!, हॉलिवूडपटात दिसणार आतापर्यंत न पाहिलेल्या अशा हटके भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 14:15 IST2020-06-20T14:15:21+5:302020-06-20T14:15:49+5:30
'द वेडिंग गेस्ट'मध्ये देव पटेलसोबत काम केल्यानंतर राधिका आणखी एका इंटरनॅशनल फिल्ममध्ये झळकणार आहे.

राधिका आपटेच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज!, हॉलिवूडपटात दिसणार आतापर्यंत न पाहिलेल्या अशा हटके भूमिकेत
मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिने आतापर्यंत वेगवेगळ्या भाषेत आणि माध्यमांतील प्रोजेक्टवर काम केले आहे. हिंदीमध्ये काम केल्यानंतर प्रादेशिक भाषा म्हणजेच मराठी, बंगाली, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेतील फक्त चित्रपटच नाही तर वेबसीरिज व लघुपटात काम केल्यानंतर आता ती इंग्रजी भाषेतील प्रोजेक्टमध्येही तिने काम केले आहे. द वेडिंग गेस्टमध्ये देव पटेलसोबत काम केल्यानंतर ती आणखीन एका इंटरनॅशनल फिल्ममध्ये झळकणार आहे. या चित्रपटाची घोषणा खुद्द तिनेच इंस्टाग्रामवर केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे अ कॉल टू स्पाय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ कॉल टू स्पाय चित्रपट आयएफसी फिल्मने घेतला आहे. राधिकाने सोशल मीडियावर गुड न्यूज देत सांगितले की, या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे राइट्स नॉर्थ अमेरिकेतील प्रोडक्शन कंपनीने घेतले आहेत. यासोबत तिने या सिनेमातील तिचा फोटोही शेअर केला आहे. या पोस्टसोबच तिने दिग्दर्शक लिडिया डिन पिल्चर आणि सहकलाकार स्टॅना कॅटीक व सारा मेघन थॉमस केले आहे.
यात राधिका नूर इनायत खान नामक हेरची भूमिका यात साकारताना दिसणार आहे. तिच्यासोबत विर्जिना हॉलच्या भूमिकेत सारा मेघन थॉमस दिसणार आहे. नूर व विर्जिनाची निवड वेरा अॅटकिन्स वर्ल्ड वॉर टूच्या मिशनसाठी निवड करतो. अ कॉल टू स्पाय सिनेमाची स्टोरी वर्ल्ड वॉर टूमधील महिला हिरोंची माहित नसलेली स्टोरी दाखवण्यात येणार आहे.
राधिका आपटेच्या या गुड न्यूजवर तिचे चाहते व काही कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. कुणी उत्सुक आहे तर कुणाला तिचा अभिमान वाटत असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.