GOOD NEWS : ईशा देओल बनली आई.. गोंडस मुलीला दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 11:27 IST2017-10-23T05:02:12+5:302017-10-23T11:27:53+5:30

नुकतीच दिवाळी संपली आहे मात्र हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या घराबाहेर अजूनही फटाके फुटायेत. याला कारण ही तसेच आहे. ...

GOOD NEWS: Isha Deol was born .. Birth of a cute girl | GOOD NEWS : ईशा देओल बनली आई.. गोंडस मुलीला दिला जन्म

GOOD NEWS : ईशा देओल बनली आई.. गोंडस मुलीला दिला जन्म

कतीच दिवाळी संपली आहे मात्र हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या घराबाहेर अजूनही फटाके फुटायेत. याला कारण ही तसेच आहे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लाडकी लेक अभिनेत्री ईशा देओलने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानीवर दोघांवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मिळालेल्या माहितीनुसार ईशाने सोमवारी रात्री 11.15 च्या सुमारास एक गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ईशाने बाळाला जन्म दिला. प्रेग्नेंसी दरम्यान ईशाने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत चर्चेत राहिली होती. तिच्या फोटोंजना सोशल मीडियावर भरभरुन लाईक्स आणि कमेंटक्सदेखील आल्या होत्या.   


2012 फेब्रुवारीमध्ये ईशाने उद्योगपती भरत तख्तानीसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर काही महिन्यातच जूनमध्ये तिने लग्न केले होते. ईशाच्या लग्नात बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर पाच वर्षांनी ईशा प्रेग्नंट असल्याची बातमी आई हेमा मालिनी यांनी ट्वीटरवर दिली होती.  ईशाने ‘एलओसी कारगिल, युवा, धुम, आॅँखे आणि कॅश’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. लग्नानंतर ईशाने इंडस्ट्रीत राहण्यास फारसा उत्साह दाखविला नाही. ती २०१५ मध्ये कन्नड चित्रपट ‘केअर आॅफ फुटपाथ’मध्ये बघावयास मिळाली होती. 



हेमा मालिनी दुसऱ्यांदा आजी बनल्या आहेत. कारण काही वर्षांपूर्वीच हेमा आणि धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहाना हिने डेरिनला जन्म दिला होता. त्यामुळे ईशानेही आपला संसार वाढवावा, अशी तिच्या आईची इच्छा होती. ईशाने आईची हि इच्छा पूर्ण केली. त्यामुळे सध्या त्यांच्या घरात आनंदाचे वातावरणा आहे. मिळालेल्या वृत्तानुसार ईशाला लहान मुले खूपच आवडतात. जेव्हा तिची लहान बहीण अहाना गर्भवती होती, तेव्हा तिनेही सर्व प्लानिंग आणि शॉपिंग केली होती. प्रेंग्नसी दरम्यान ईशा आई हेमा मालिनेकडे जुहूला राहत होती.  मात्र अधुन-मधून ती सासरवाडी बांद्रा येथेही जात होती. नुकतेच हेमा मालिनी यांच्या आयुष्यावर आधारित ‘बियाँड द ड्रिम गर्ल’ या आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.

Web Title: GOOD NEWS: Isha Deol was born .. Birth of a cute girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.