खूशखबर ! ‘नमक हलाल’ पुन्हा रिलीज होणार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 13:21 IST2017-05-19T09:57:28+5:302017-05-20T13:21:23+5:30
अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील स्टारर ‘नमक हलाल’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट आठवतो? आठवत नसेल तर तुम्ही तो पुन्हा पाहू ...

खूशखबर ! ‘नमक हलाल’ पुन्हा रिलीज होणार!!
अ िताभ बच्चन आणि स्मिता पाटील स्टारर ‘नमक हलाल’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट आठवतो? आठवत नसेल तर तुम्ही तो पुन्हा पाहू शकता. टीव्ही वा हॉटस्पॉटवर नाही, तर चित्रपटगृहांत जावून. होय, ‘नमक हलाल’ हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आणि त्यांच्या जुन्या चित्रपटांच्या दर्दी प्रेक्षकांसाठी ही निश्चितपणे आनंदाची बातमी आहे.
‘नमक हलाल’ हा चित्रपट रिलीज होऊन ३५ वर्षे झालीत. याच मुहूर्तावर हा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. थिएटर आॅन डिमांड सर्व्हिस आणि शेमारू एंटरटेनमेंटने हा चित्रपट पुन्हा एकदा देशभर रिलीज करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. येत्या २१ मे रोजी ‘नमक हलाल’ची स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे. पाश्चिमात्य देशात विशेष गाजलेले सिनेमे नव्याने रिलीज करण्याचा प्रघात आहे. आता भारतातही हाच ट्रेंड येऊ पाहतो आहे. थिएटर आॅन डिमांड सर्व्हिस आणि शेमारू एंटरटेनमेंट हा ट्रेंड आणू पाहत आहे. नव्या पिढीला देशातील क्लासिक चित्रपटांची ओळख करून देणे, हा यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
‘नमक हलाल’मधील अमिताभचा ‘आई कॅन टॉक इंग्लिश..आई कॅन वॉक इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज वेरी फनी लैंग्वेज...’ हा डायलॉग कमालीचा गाजला होता. शिवाय ‘पग घुंगरू ’ आणि ‘आज रपट जाए तो’ ही चित्रपटाची गाणीही तुफान लोकप्रीय झाली होती. आता या गाण्यांची जादू पुन्हा एकदा प्रेक्षक अनुभवू शकणार आहेत.