GOOD NEWS : बद्री आणि त्याची दुल्हनिया पुन्हा येणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 13:55 IST2017-03-16T08:25:34+5:302017-03-16T13:55:34+5:30
चुलबुली आलिया भट्ट आणि हँडसम वरूण धवन यांचा अलीकडे आलेला ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ तुम्ही पाहिला असेलच. चित्रपट सुपरहिट झाला. ...

GOOD NEWS : बद्री आणि त्याची दुल्हनिया पुन्हा येणार!
च लबुली आलिया भट्ट आणि हँडसम वरूण धवन यांचा अलीकडे आलेला ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ तुम्ही पाहिला असेलच. चित्रपट सुपरहिट झाला. थांबा...थांबा...बातमी केवळ इतकीच नाही. खरी बातमी पुढे आहे. होय, बद्री आणि त्याची दुल्हनिया पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तेही ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’च्या पुढच्या भागात. होय, चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतान यांनी स्वत: याचे संकेत दिले आहेत.
‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’नंतर आम्ही या चित्रपटाच्या फ्रेंचाइजीला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. बॉक्सआॅफिसवर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ला चांगली ओपनिंग मिळाली. या यशानंतर आम्ही तिसºया पार्टचे प्लानिंग करणार आहोत. तूर्तास स्क्रिप्ट तयार नाहीय. पण ती तयार होईल, इतके नक्की, असे खेतान म्हणाले.
ALSO READ : film review : ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’- एक सहज-सुंदर कथा
या फ्रेंचाइजीमध्येही वरूण धवन व आलिसा भट्ट या दोघांची वर्णी लागणे, निश्चित मानले जात आहे. एकंदर काय तर फ्रेंचाइजी चित्रपटांच्या शृंखलेत करण जोहर आपल्या बॅनरखाली आणखी एक चित्रपट जोडू पाहतो आहे.बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. अशा रोमॅन्टिक चित्रपटाची फ्रेंचाइजी बनवणे सोपे खचितच नसेल. पण करण जोहर हे आव्हान स्विकारण्यात माहिर आहे, हे सांगणे नकोच.
लकवरच ‘गोलमान’ फ्रेंचाइजीचा ‘गोलमाल4’ आपल्याला पाहायला मिळणार आहे. याशिवाय ‘हाऊसफुल4’,‘हेराफेरी3’, ‘दबंग3’,‘जॉली एलएलबी3’ असे अनेक फ्रेंचाइजी चित्रपट येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेव्हा प्रतीक्षा करू यात...तुम्हीही आणि आम्हीही!!