Good news! अदनान सामीला कन्यारत्न, ट्विटरवर सांगितले नाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2017 11:30 IST2017-05-10T05:59:53+5:302017-05-10T11:30:44+5:30
लोकप्रीय गायक अदनान सामी आणि त्याची पत्नी रोया सामी यांच्या घरी कन्यारत्नाने जन्म घेतला आहे. अदनानने स्वत: twitterवर ही ...
(40).jpg)
Good news! अदनान सामीला कन्यारत्न, ट्विटरवर सांगितले नाव!
ल कप्रीय गायक अदनान सामी आणि त्याची पत्नी रोया सामी यांच्या घरी कन्यारत्नाने जन्म घेतला आहे. अदनानने स्वत: twitterवर ही गोड बातमी शेअर केली. आम्हाला मुलगीच हवी होती. आमच्या घरी एक चिमुकली परी आली आहे. माझा व रोयाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, असे tweet अदनानने केले आहे. माझी मुलगी माझी नवी प्रेरणा बनून आली. माझे जग तिच्यापेक्षा वेगळे नाही, असेही त्याने म्हटले आहे. अदनान व त्याची पत्नी रोया या दोघांनी आपल्या चिमुकलीचे मदीना असे नामकरण केले आहे.
खरे तर अदनानसाठी ही डबल सेलिब्रेशनची वेळ आहे. होय, मुलीच्या जन्माने अदनान सुखावला आहेच. यासोबत अलीकडे अदनानला ब्रिटीश पार्लमेंटच्या पुरस्काराने गौरविण्यात आहे. संगीताच्या जगात अभूतपूर्व योगदानासाठी त्याला एशियन अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. हा अवार्ड स्वीकारताना अदनानने तो त्याच्या वडिलांना समर्पित केला होता. हा अवार्ड मी माझ्या वडिलांना समर्पित करतो आणि भारताच्या नावे स्वीकारतो, असे तो म्हणाला होता.
काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचे नागरिकत्व सोडून अदनान सामी भारतीय नागरिक बनना. भारतीय नागरिकत्व स्वीकारून तो मुंबईत स्थायिक झाला. अलीकडे एका इव्हेंटमध्ये, तो यावर भरभरून बोलला होता. मी भारतीय आहे आणि माझी मुले एकदम देशी असावेत, असे मला वाटते, असे तो म्हणाला होता.
काही दिवसांपूर्वी स्नॅपचॅटचा सीईओ एवान स्पीगल याने भारतातील लोक स्नॅपचॅटच्या वापरासाठी अतिशय गरिब आहे, असे विधान केले होते. त्याच्या या विधानाच्या निषेधार्थ भारतातील तमाम स्नॅपचॅट युजर्सनी स्नॅपचॅट डिलिट केले होते. यात अदनान सामीचाही समावेश होता. यावेळी पाकिस्तानकडून त्याला ट्रोल व्हावे लागले होते.