पोर्नस्टारची भूमिका असलेला राम गोपाल वर्माचा ‘गॉड, सेक्स अॅण्ड ट्रुथ’ वादाच्या भोवऱ्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 15:39 IST2018-01-20T09:59:51+5:302018-01-20T15:39:24+5:30
राम गोपाल वर्माच्या आगामी ‘गॉड, सेक्स अॅण्ड ट्रुथ’ या चित्रपटात पोर्नस्टार मिया माल्कोवा हिची मुख्य भूमिका आहे. मात्र हा चित्रपट आता वादाच्या भोवºयात सापडला आहे.

पोर्नस्टारची भूमिका असलेला राम गोपाल वर्माचा ‘गॉड, सेक्स अॅण्ड ट्रुथ’ वादाच्या भोवऱ्यात!
क ही दिवसांपूर्वीच राम गोपाल वर्मा याच्या आगामी ‘गॉड, सेक्स अॅण्ड ट्रुथ’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटातून रामू पोर्नस्टार मिया माल्कोवा हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करीत आहे. सनी लिओनीनंतर मिया दुसरी पोर्न स्टार आहे, जी बॉलिवूडमध्ये एंट्री करीत आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मियाला अतिशय वादग्रस्तरीत्या दाखविण्यात आले आहे. त्यामुळेच तिच्या या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होताच काही मिनिटांतच तो सर्वत्र व्हायरल झाला. परंतु आता हा चित्रपट वादाच्या भोवºयात सापडताना दिसत आहे.
खरं तर रामू त्याच्या प्रत्येक चित्रपटामुळे चर्चेत असतो. मात्र या चित्रपटामुळे तो सुरुवातीपासून वादाच्या भोवºयात सापडला आहे. परंतु पोर्नस्टार मियामुळे नव्हे तर त्याने या चित्रपटाची आयडिया चोरली असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ‘सरकार-३’चे लेखक पी. जया कुमार यांनी रामूवर हा आरोप केला आहे. जया कुमार यांच्या मते, या चित्रपटाची कथा तीच आहे, जी मी स्क्रिप्ट लिहिली होती. मी एकदा राम गोपाल वर्माला ही स्क्रिप्ट दाखविली होती. त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठीच मी त्याला स्क्रिप्ट दाखविली. परंतु जेव्हा मी ट्रेलर बघितला तेव्हा मला धक्काच बसला. कारण चित्रपटाचा ट्रेलर माझ्या स्क्रिप्टची कार्बन कॉपी आहे. मिया माल्कोवाच्या पहिल्या शब्दापासून ते अखेरपर्यंत माझीच स्क्रिप्ट वाचली जात असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी जया कुमारने भविष्यात राम गोपाल वर्माबरोबर कधीही काम न करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अॅडल्ट अभिनेत्री मिया माल्कोवा बघावयास मिळत आहे. ती तिची कथा ट्रेलरमध्ये सांगताना दिसत आहे. ‘गॉड, सेक्स अॅण्ड ट्रुथ’चा संपूर्ण व्हिडीओ मिया माल्कोवाच्या आॅफिशियल व्हिडीओ चॅनलवर २६ जानेवारी २०१८ रोजी रिलीज केला जाणार आहे.