प्रवासातही "STYLE CONCIOUS"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 00:52 IST2016-02-21T07:52:52+5:302016-02-21T00:52:52+5:30

बॉलीवूडच्या कलाकारांच्या फॅशनचे दुसरे नाव म्हणजे प्रवास. अशा वेळी लोकांच्या नजरेत आपण राहणार असल्याचे भान त्यांना असतेच. त्यामुळे सुंदर, ...

On the go "STYLE CONCIOUS" | प्रवासातही "STYLE CONCIOUS"

प्रवासातही "STYLE CONCIOUS"

ong>बॉलीवूडच्या कलाकारांच्या फॅशनचे दुसरे नाव म्हणजे प्रवास. अशा वेळी लोकांच्या नजरेत आपण राहणार असल्याचे भान त्यांना असतेच. त्यामुळे सुंदर, ताजेतवाने दिसण्यासाठी ते सातत्याने धडपडत असतात.

बेसिक मेकअप करण्यास ते अशावेळी विसरत नाहीत. अगदी २० तासाचा प्रवास असला तरी देखील विमानतळावर अथवा इतर सार्वजनिक ठिकाणी ते अगदी सुहास्यवदनाने सामोरे जात असतात. प्रवासादरम्यान त्यांच्या कोणत्या फॅशन्स असतात, त्यांची स्टाईल कशी असते हे पाहणे देखील सुखावणारे असते.



दीपिका पदुकोन
लोकांच्या नजरेत राहण्यासाठी दीपिकाची नेहमीच धडपड असते. बºयाचवेळा विमानतळावर दीपिका तुम्हाला छानशी दिसेल. डोळ्यावर सिग्नेचर ग्लासेस आणि मेकअपविना तुम्हाला ती दिसू शकते. विनामेकअपही ती सुंदर दिसते. जीन्स आणि लाँग स्लीव्हड टॉप याकडे तिचे अधिक लक्ष असते.



प्रियंका चोप्रा
प्रवासादरम्यान वेगळ्या स्टाईलमध्ये प्रियंका चोप्रा तुम्हाला दिसू शकते. प्रवासात ती मेकअप करीत नाही. रेड-ब्राऊन रंगाची लिपस्टीक तिची आवडती आहे. जॅकेट, स्टोल्स तिला अशावेळी घालावयास आवडतात. 



सलमान खान
प्रवासादरम्यान सलमान खानला ट्रॅक पँट घालावयास आवडतात. डॅशिंग डेनिम ही त्याची दुसरी पसंती आहे. मिस मॅच करण्याकडे त्याचा अधिक कल असतो. उदाहरणार्थ गडद निळ्या रंगाची पँट आणि डेनिम शर्ट. हे कदाचित अजब वाटेल परंतु कॉपर बेल्टसोबत तो नक्कीच पाहण्यासारखा असतो. बºयाचवेळा तो फ्रेंच दाढी राखलेला दिसतो. बिर्इंग ह्युमनचा टी शर्ट, त्याचवेळी कॅज्युएल जॅकेट आणि कॅपही बºयाचवेळा दिसेल.



शाहरुख खान
पत्नी गौरीबरोबरच शाहरुख हा आपल्या स्टाईलविषयी लोकप्रिय आहे. डार्क शेडमधील ब्लॅक जॅकेट आणि जीन्स त्याला आवडतात. दिवसेंदिवस अधिकाधिक तरुण दिसण्याकडे तो लक्ष देतो. शाहरुखचा डेनिम जीन्सकडे कल आहे. नेव्ही टी शर्टही त्याला आवडतात. साध्या टी शर्टवर ब्लेझर, सोबत पनामा हॅट आणि ट्रेंडी गॉगल तुम्हाला दिसू शकतो.



अक्षय कुमार
अक्षयला स्टाईल आॅफ आयकॉन असेही म्हणता येईल. निळा डेनीम शर्ट आणि जीन्स तुम्हाला दिसेल. कार्गो पँट सोबत काळ्या रंगाचा टी शर्ट ही त्याची आवड आहे. फेडोरा हॅटही त्याच्या स्टाईलमध्ये भर घालते.  गुडघ्याजवळ दुमडलेली जीन्स ही देखील त्याला शोभते.



रणबीर कपूर
आपल्या ट्रेंडी फॅशनसाठी रणबीर प्रसिद्ध आहे. बºयाचवेळा कॅज्युएल अवतारात तो दिसेल. नटखट रणवीर प्रवासादरम्यान कम्फर्टेबल राहण्याचा प्रयत्न करतो. त्याला संगीत आवडते, त्यामुळे हेडफोनसह बºयाचवेळा दिसून येईल.

 

Web Title: On the go "STYLE CONCIOUS"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.