#GharMorePardesiya: ट्रेलरआधी रिलीज होणार ‘कलंक’चे गाणे, पाहा टीजर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 14:47 IST2019-03-17T14:47:37+5:302019-03-17T14:47:40+5:30
पण ‘कलंक’च्या मेकर्सनी प्रेक्षकांना एक खास सरप्राईज देत ट्रेलर आधी चित्रपटाचे गाणे रिलीज करण्याचा निर्णय प्रेक्षकांनी घेतला आहे.

#GharMorePardesiya: ट्रेलरआधी रिलीज होणार ‘कलंक’चे गाणे, पाहा टीजर!!
अलीकडे रिलीज झालेला ‘कलंक’चा टीजर प्रेक्षकांना प्रचंड भावला. या टीजरनंतर प्रेक्षकांच्या नजरा ‘कलंक’च्या ट्रेलरकडे लागल्या आहेत. पण ‘कलंक’च्या मेकर्सनी प्रेक्षकांना एक खास सरप्राईज देत ट्रेलर आधी चित्रपटाचे गाणे रिलीज करण्याचा निर्णय प्रेक्षकांनी घेतला आहे. उद्या हे गाणे रिलीज होत आहे. तत्पूर्वी आज या गाण्याचा टीजर तुम्हाला पाहता येणार आहे.
‘घर मोरे परदेसिया...’ असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्याच्या टीजरमध्ये माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट, आदित्य कपूर, संजय दत्त, वरूण धवन यांची झलक पाहायला मिळते. प्रीतमने कंम्पोज केलेल्या या गाण्यात आलिया कथ्थक करताना दिसणार आहे.
अद्याप ‘कलंक’च्या कथेबद्दल फार खुलासा झालेला नाही. पण चर्चा खरी मानाल तर हा चित्रपट हिंदू- मुस्लिम वादावर आधारित आहे. ८० कोटी रूपये खर्चून बनवलेला हा चित्रपट अगदी शूटींग सुरु झाल्यापासून चर्चेत आहे.
४० च्या दशकाची कथा असलेल्या या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे दमदार कलाकार आहेत. साहजिकचं या चित्रपटाकडून करणला प्रचंड अपेक्षा आहेत. चित्रपटाला भव्यदिव्य बनवण्यात करण कुठलीही कसर सोडलेली नाही. त्यामुळे रिलीजच्या एक महिन्यापूर्वीच या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे. जाणकारांच्या मते, हा चित्रपट आलिया व वरूणच्या करिअरमधील हायेस्ट ओपनिंग ग्रॉसर ठरू शकतो. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.