लग्न करून मुलं पैदा करावेत; सरोगसीचे नाटक कशासाठी? अबू आझमींची करण जोहरवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 14:08 IST2017-03-07T08:09:06+5:302017-03-07T14:08:50+5:30
दिग्दर्शक करण जोहर याने दोन दिवसांपूर्वीच सरोगसी पद्धतीद्वारे जुळ्या मुलांचा ‘बाप’ बनल्याची बातमी जगजाहीर केली अन् संबंध बॉलिवूडकरांनी त्याच्यावर ...

लग्न करून मुलं पैदा करावेत; सरोगसीचे नाटक कशासाठी? अबू आझमींची करण जोहरवर टीका
द ग्दर्शक करण जोहर याने दोन दिवसांपूर्वीच सरोगसी पद्धतीद्वारे जुळ्या मुलांचा ‘बाप’ बनल्याची बातमी जगजाहीर केली अन् संबंध बॉलिवूडकरांनी त्याच्यावर शुभेच्छांचा एकच वर्षाव केला, परंतु सपा नेता अबू आझमी यांना काही करणची ही गुड न्यूज फारशी पचलेली दिसली नाही. त्यांनी त्याच्यावर असा काही ‘वॉर’ केला की, ज्यामुळे पुन्हा एकदा राजकारणी विरुद्ध बॉलिवूड असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
अबू आझमीने म्हटले की, ‘एवढे वय झाले, लग्न का केले नाही. लग्न करून मुलं पैदा करावेत, इंडस्ट्रीमध्ये मुलींची कमी आहे का?, काही बिमारी असेल तर मुले दत्तक घ्यायचे असते. सरोगसीचे नाटक करायची गरजच काय?’ अशी खोचक टीका अबू आझमी यांनी केली. अबू आझमी यांच्या या डिवचणाºया टीकेवर करणकडून जरी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली गेली नसली तरी, इंडस्ट्रीमध्ये आता चर्चेला उधान आले आहे.
![]()
करणने ४ मार्च रोजी ट्विटरवरून आपण सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचा बाप झाल्याचे जाहीर केले होते. तसेच मुलांचे ‘यश आणि रुही’ असे नावे ठेवल्याचेही त्याने ट्विटमध्ये म्हटले होते. गेल्या ७ फेब्रुवारीला करण सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचा बाप बनला होता. या दोन्ही मुलांचे गेल्या शुक्रवारी बर्थ रजिस्ट्रेशन करण्यात आले असून, त्यामध्ये करणचे नाव मुलांचे वडील म्हणून नोंदविले गेले आहे.
अबू आझमीने पत्रकारांशी बोलताना करणवर जोरदार टीका केली होती. अबू आझमी यांनी पहिल्यांदाच इंडस्ट्रीमधील लोकांवर टीका केली असे अजिबात नाही; तर यापूर्वीदेखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. काही दिवसांपूर्वीच नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथे एका मुलीशी केलेल्या छेडछाडीवर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून लोकांचा रोष ओढवून घेतला होता. यावेळी बॉलिवूड विरुद्ध आझमी असा सामनाही रंगला होता. आता आझमींच्या या टीकेला करण कशापद्धतीने उत्तर देणार हे बघणे मजेशीर ठरेल.
ALSO READ :
- करण जोहर झाला जुळ्या मुलांचा ‘कुंवारा’ बाप...
- करण जोहरप्रमाणे या सेलिब्रिटींनीही ‘बाप’ बनण्यासाठी घेतली सरोगसीची मदत!
- आलिया भट्टला मिळाले जुळे भाऊ-बहीण

दरम्यान, अभिनेता तुषार कपूरनंतर अविवाहित बाप बनलेला करण दुसरा सेलिब्रेटी ठरला आहे, तर सरोगसीविषयी बोलायचे झाल्यास करण जोहरप्रमाणे शाहरूख खान याच्या तिसºया ‘अबराम’ नावाच्या मुलाचा जन्मही याच पद्धतीने झाला होता. २०१३ मध्ये त्यानेही बातमी जाहीर केली होती. आणखीनही बरेचसे सेलिब्रेटी आहेत, जे सरोगसी पद्धतीने बाप बनले आहेत.pic.twitter.com/OyGb4SnwId— Karan Johar (@karanjohar) March 5, 2017