‘इशारों इशारों में’ करण जोहरवर बरसली काजोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 13:09 IST2017-04-05T07:39:57+5:302017-04-05T13:09:57+5:30

बॉलिवूडमध्ये कुणी कुणाचे मित्र नाही. अनेकदा हे खरे ठरले आहे. सध्या हे वाक्य आठवण्याचे कारण म्हणजे, करण जोहर आणि ...

'Gesture gestures' Karan Johar years ago Kajol! | ‘इशारों इशारों में’ करण जोहरवर बरसली काजोल!

‘इशारों इशारों में’ करण जोहरवर बरसली काजोल!

लिवूडमध्ये कुणी कुणाचे मित्र नाही. अनेकदा हे खरे ठरले आहे. सध्या हे वाक्य आठवण्याचे कारण म्हणजे, करण जोहर आणि काजोल यांच्यातील वाद. होय, कधीकाळी करण व काजोल यांच्यात नको इतकी घनिष्ठ मैत्री होती. त्यांच्या मैत्रीचे किस्से दूरदूरपर्यंत लोकप्रीय होते. काजोल माझ्यासाठी लकी आहे, असे सांगताना करण थकत नसे. पण अचानक कुठे माशी शिंकली कोण जाणे; पण करण व काजोलची मैत्री तुटली. इतकी की, आता दोघेही एकमेकांकडे पाहणेही पसंत करत नाही. 



ALSO READ : ​करण म्हणतो, माझ्या व काजोलच्या नात्यात आता काहीही उरलेले नाही

आपल्या बायोग्राफीत करणने काजोलसोबतच्या वादाचा उल्लेख केला होता. आमच्यात काही मतभेद झालेत. असे काही घडले, ज्यामुळे मी खोलवर दुखावला गेलो. मी याबद्दल काहीही बोलणार नाही. खरे तर तिच्यात व माझ्यात काहीही बिनसलेले नव्हतेच. जे काही झाले ते माझ्यात व तिच्या पतीदरम्यान झाले होते. जे काही घडले, ते केवळ ती, मी व तिचा पती एवढे तिघेच जाणतो. पण मी ते सगळे मागे सोडू इच्छितो. २५ वर्षांची मैत्री विसरून ती आपल्या पतीची साथ देत असेल तर माझ्यामते, हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. मी समजू शकतो. मी तिच्या अतिच जवळ होतो.  पण आता आमच्यातील सगळे काही संपलेले आहे. तिने मला चांगलेच दुखावले, असे करणने यात लिहिले आहे.

खरे तर काजोल या मुद्यावर आत्तापर्यंत काहीही बोलली नव्हती. पण अलीकडे एका इव्हेंटमध्ये ती रिअ‍ॅक्ट झाली आणि अशी रिअ‍ॅक्ट झाली की, करणला तिचा हा टोमणा झोंबणार म्हणजे झोंबणार. होय, मला सध्या कुठल्याही वादावर बोलायचे नाही. तूर्तास या मुद्यावर शांत राहणेच योग्य आहे. योग्यवेळी या विषयी मी प्रतिक्रिया देईन आणि माझे मत सर्वांपर्यंत पोहोचेल याची मी काळजी घेईन. माझ्या मते हल्ली प्रामाणिकपणाचा आव आणून वागण्याचे प्रमाण वाढले आहे. फक्त एका पुस्तकाची विक्री करण्यासाठी, चित्रपटाला चांगले रेटिंग मिळण्यासाठी बरेच लोक इतरांना त्यांच्या प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देतात. कॅमेº्यासमोर खोटं बोलण्याला बरीच कारणे असू शकतात. त्यामुळे सध्या प्रामाणिकपणाची काहीच किंमत राहिली नाहीये असेच म्हणावे लागेल,असे काजोल म्हणाली. आता तिचा इशारा कुणाकडे होता, हे तुम्ही समजू शकताच.

Web Title: 'Gesture gestures' Karan Johar years ago Kajol!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.