A Gentleman trailer : पाहा, सिद्धार्थ मल्होत्राचे ‘Sundar, Susheel, Risky’ रूप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 13:55 IST2017-07-10T08:25:27+5:302017-07-10T13:55:27+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा व जॅकलिन फर्नांडिस यांच्या आगामी ‘अ जेंटलमॅन’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये तुम्हाला सिद्धार्थचे ‘सुंदर, सुशील आणि धाडसी’ रूप पाहायला मिळणार आहे.

A Gentleman trailer: See, Siddharth Malhotra's 'Sundar, Susheel, Risky' look! | A Gentleman trailer : पाहा, सिद्धार्थ मल्होत्राचे ‘Sundar, Susheel, Risky’ रूप!

A Gentleman trailer : पाहा, सिद्धार्थ मल्होत्राचे ‘Sundar, Susheel, Risky’ रूप!

द्धार्थ मल्होत्रा व जॅकलिन फर्नांडिस यांच्या आगामी ‘अ जेंटलमॅन’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये तुम्हाला सिद्धार्थचे ‘सुंदर, सुशील आणि धाडसी’ रूप पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात सिद्धार्थचा डबलरोल आहे. गौरव आणि ऋषी अशी दुहेरी पात्र त्याने रंगवलेली आहेत. तर जॅकलिनने काव्या नामक मुलीची भूमिका साकारली आहे. गौरव अतिशय शालिन मुलगा आहे. त्याच्याकडे सगळे काही आहे. केवळ प्रेमाची कमतरता आहे. अशात काव्या त्याच्या आयुष्यात येते. गौरव काव्यावर अतिशय पे्रम करतो. तिच्याशी लग्न करू इच्छितो. पण काव्याला काहीसा धाडसी मुलगा हवा असतो. गौरवमध्ये सगळे काही चांगले आहे. पण तो जरा जास्तच ‘सेफ’ आहे, असे काव्याला वाटत असते. याचदरम्यान चित्रपटात हुबेहुब गौरवसारख्या दिसणाºया ऋषीची एन्ट्री होते, असे या ट्रेलरमध्ये दिसते आहे. ट्रेलर पाहता, ऋषी हा एक माफिया वा चोर असावा असे भासते. त्याच्यामागे लागलेले लोक ऋषी समजून गौरवला पकडतात. येथून अ‍ॅक्शन व रोमान्सची सुरूवात होते. 



ALSO READ : ​सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्टचे झाले जोरदार भांडण; ‘ही’ हिरोईन ठरली कारणीभूत!

सुनील शेट्टी व दर्शन कुमार यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये सुनील शेट्टीचेही दर्शन घडते. दीर्घकाळानंतर सुनील शेट्टीला पडद्यावर पाहणे निश्चितपणे इंटरेस्टिंग असणार आहे. ‘अ जेंटलमॅन’ एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. राज निदीमोरू व कृष्णा डिके लिखित व दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २५ आॅगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तूर्तास सिद्धार्थ ‘इत्तेफाक’च्या शूटींगमध्ये बिझी आहे.  हा चित्रपट १९६९ मध्ये आलेल्या राजेश खन्ना यांच्या ‘इत्तेफाक’ या चित्रपटाचा रिमेक आहे.

Web Title: A Gentleman trailer: See, Siddharth Malhotra's 'Sundar, Susheel, Risky' look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.