पती रितेश देशमुखला रिसिव्ह करायला गेलेल्या जेनेलियाची हसावे की रडावे अशी झाली अवस्था!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 21:39 IST2017-09-13T16:09:21+5:302017-09-13T21:39:21+5:30
सध्या चित्रपटांमधून गायब झालेली अभिनेत्री जेनेलिया डिसूजा काही दिवसांपूर्वी पती रितेश देशमुख याला रिसिव्ह करण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचली होती. ...
.jpg)
पती रितेश देशमुखला रिसिव्ह करायला गेलेल्या जेनेलियाची हसावे की रडावे अशी झाली अवस्था!!
स ्या चित्रपटांमधून गायब झालेली अभिनेत्री जेनेलिया डिसूजा काही दिवसांपूर्वी पती रितेश देशमुख याला रिसिव्ह करण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचली होती. पती रितेशला बघून जेनेलिया अशी काही एक्साइडेट झाली होती की, बघणारे दंग राहिले. रितेश बघून तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती पळत लगेचच त्याच्या गळ्यात पडली. रडावे की हसावे असे तिला काहीच सुचत नव्हते. जेव्हा रितेशनी तिला मिठी मारली तेव्हा तिच्या चेहºयावर काहीसे हास्य फुलले. या दोघांची ही भेट बघून असे वाटत होते की, गेल्या काही काळापासून हे दाम्पत्य एकमेकांना भेटले नसावे. परंतु असे काहीही नसून, या दोघांमधील प्रेम आजही प्रचंड असून, त्यांना एकमेकांपासूनचा दुरावा अजिबातच सहन होत नाही हेच यावरून सिद्ध होते.
![]()
दरम्यान, जेव्हा जेनेलिया रितेशला भेटत होती, तेव्हा काही कॅमेरामनही तिची छबी टिपण्यासाठी समोर आले होते. परंतु जेनेलियाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यादरम्यान या दोघांचे काही फोटोज् क्लिक केले गेले. दोघेही त्यांच्या एका क्लोज मित्राबरोबर मस्तीच्या मूडमध्ये दिसत होते. यावेळी जेनेलिया व्हाइट टी-शर्ट आणि ग्रे जीन्समध्ये बघावयास मिळाली. तसेच तिने साइड पर्स कॅरी केली होती. तर रितेश देशमुख ट्रॅक सूटमध्ये बघावयास मिळाला.
![]()
पुढे हे दोघेही एकमेकांचा हात पकडून विमानतळाच्या बाहेर आले आणि कारमध्ये बसले. जेव्हा हे दोघे विमानतळाच्या बाहेर येत होते, तेव्हा दोघेही गॉसिपमध्ये दंग होते. शिवाय एका मित्रासोबत कुठल्यातरी विषयावरून हसत होते. रितेश त्याच्या आगामी ‘टोटल धमाल’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट २०१८ मध्ये रिलिज होणार आहे. या व्यतिरिक्त रितेश एका मराठी चित्रपटातही बघावयास मिळणार असून, त्यावर सध्या प्रचंड मेहनत घेत असल्याचे समजते.
![]()
![]()
यावर्षी रितेशचा ‘बॅँक चोर’ हा चित्रपट रिलीज झाला होता. परंतु बॉक्स आॅफिसवर त्याचा हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. गेल्या बºयाच काळापासून रितेशचा एकही चित्रपट हिट ठरला नसल्याने सध्या तो एका चांगल्या हिटच्या शोधात आहे.