१० वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर का होती? जिनिलियाने सांगितलं खरं कारण, म्हणाली- "लग्न झाल्यावर मी.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:03 IST2025-06-23T12:59:09+5:302025-06-23T13:03:29+5:30

जिनिलिया देशमुखने लग्नानंतर १० वर्ष अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला होता. काय होतं यामागचं कारण. जाणून घ्या

genelia deshmukh talk about why she take break 10 years After marriage with riteish deshmukh | १० वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर का होती? जिनिलियाने सांगितलं खरं कारण, म्हणाली- "लग्न झाल्यावर मी.."

१० वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर का होती? जिनिलियाने सांगितलं खरं कारण, म्हणाली- "लग्न झाल्यावर मी.."

जिनिलिया देशमुख ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. काही वर्षांपासून जिनिलियाने मराठी सिनेमातही काम करुन सर्वांना 'वेड' लावलं. जिनिलिया नुकतीच 'सितारे जमीन पर' सिनेमात झळकली. या सिनेमात जिनिलियाने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक होतं. करिअरच्या शिखरावर असताना जिनिलियाने अभिनेता रितेश देशमुखसोबत लव्ह मॅरेज केलं. लग्नानंतर मात्र जिनिलिया तब्बल १० वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर होती. काय होतं यामागचं कारण? याचा खुलासा जिनिलियाने केला आहे.

..म्हणून जिनिलिया दहा वर्ष होती अभिनय क्षेत्रापासून दूर

२०२२ साली जिनिलियाने बॉलिवूड हंगामाशी याविषयी खुलासा केला होता. लग्नानंतर तब्बल १ दशक जिनिलिया अभिनय क्षेत्रापासून दूर होती.  याविषयी ती म्हणाली, "गेली १० वर्ष मी गृहिणी म्हणून जबाबदारी निभावली. मी बाकी काही काम केलं नाही. मी नात्यांची जबाबदारी सांभाळत होते. प्रामाणिकपणे सांगायचं तर तेच माझं आयुष्य होतं. गृहिणी होणं ही खूप कठीण गोष्ट आहे." अशाप्रकारे जिनिलियाने लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला आणि कुटुंबाकडे लक्ष दिलं. तरीही जिनिलिया जशी संधी मिळेल तशी मराठी सिनेमात छोट्या छोट्या भूमिका करताना दिसली.


जिनिलियाच्या 'सितारे जमीन पर'ची चर्चा

'सितारे जमीन पर' हा सिनेमा २० जून रोजी रिलीज झाला. या सिनेमात आमिर खान प्रमुख भूमिकेत आहे. हा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात १० नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा विशेष सहभाग आहे. आमिर - जिनिलीया या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

Web Title: genelia deshmukh talk about why she take break 10 years After marriage with riteish deshmukh