रितेश-जिनिलियाचा नवा-कोरा व्हिडिओ पाहून चाहत्यांना आली 'गोड' शंका; काहींनी थेटच विचारलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 10:38 IST2023-09-10T10:21:10+5:302023-09-10T10:38:04+5:30

रितेश देशमुख पत्नी जिनिलियासह काल मुंबईतील एका फॅशन स्टोअरच्या लाँचसाठी पोहोचला.

genelia deshmukh pregnant for third time rumours spread after riteish genelia couple video viral | रितेश-जिनिलियाचा नवा-कोरा व्हिडिओ पाहून चाहत्यांना आली 'गोड' शंका; काहींनी थेटच विचारलं!

रितेश-जिनिलियाचा नवा-कोरा व्हिडिओ पाहून चाहत्यांना आली 'गोड' शंका; काहींनी थेटच विचारलं!

बॉलिवूडचं क्युट कपल रितेश देशमुख-जिनिलिया (Riteish Deshmukh-Genelia Deshmukh) कायम चर्चेत असतात. त्यांचे विनोदी रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसंच दोघांचा 'वेड' हा मराठी सिनेमा सुपरहिट झाल्याने त्यांचा भाव आणखी वाढला आहे. बॉलिवूडच्या अनेक इव्हेंट्समध्ये हे कपल हातात हात घेऊन पोहोचतं. चाहत्यांची तर ही लाडकी जोडी आहे. तर रितेश दादा आणि जिनिलिया वहिनी तिसऱ्यांदा आई बाबा होणार की काय अशी चर्चा रंगली आहे. याला कारण ठरलंय कालपासून व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ.

रितेश देशमुख पत्नी जिनिलियासह काल मुंबईतील एका फॅशन स्टोअरच्या लाँचसाठी पोहोचला. नेहमीप्रमाणेच हे क्युट कपल हातात हात घेऊन आले. पापाराझींसमोर त्यांनी हसत हसत पोज दिली. रितेशने पांढरा शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. यामध्ये तो नेहमीसारखाच हँडसम दिसत होता. मात्र जिनिलियाने एक छानसा गडद निळ्या रंगाचा वनपीस घातला होता. तसंच हाय हील्सही घातली होती. दरम्यान जिनिलियाचा हात पोटावर होता. तिचं यामध्ये पोट सुटलेलं स्पष्ट दिसत होतं. रितेश तिचा हात धरुन तिला घेऊन जात होता. त्यामुळे स्वाभाविक आहे की चाहत्यांना जिनिलिया प्रेग्नंट आहे की काय असाच प्रश्न पडला. हा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा भडिमार केला. 'बापरे, परत प्रेग्नंट','तिसऱ्यांदा प्रेग्नंट? आता भारताच्या लोकसंख्येचा विचार नाही आला का?','गुड न्यूज आहे वाटतं' अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

रितेश आणि जिनिलिया २ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांना दोन मुलं आहेत. २०१४ मध्ये जिनिलियाने रियानला आणि २०१६ मध्ये राहीलला जन्म दिला. त्यांचं कुटुंब पूर्ण झालं. आता इतक्या वर्षांनी पुन्हा जिनिलिया प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अभिनेत्रीने मात्र अद्याप यावर कोणतंच स्पष्टीकरण दिलेलं नाही.

Web Title: genelia deshmukh pregnant for third time rumours spread after riteish genelia couple video viral