"ॲपल ऑफ माय आय ...", जिनिलिया देशमुखनं कुणासाठी लिहिली खास खास पोस्ट ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 11:22 IST2024-09-12T11:21:13+5:302024-09-12T11:22:07+5:30
नुकतेच जिनिलियाने इन्स्टाग्राम एक खास पोस्ट केली आहे. जिने सर्वांचं लक्ष वेधले आहे. Genelia Deshmukh

"ॲपल ऑफ माय आय ...", जिनिलिया देशमुखनं कुणासाठी लिहिली खास खास पोस्ट ?
Riteish Deshmukh Genelia Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. महाराष्ट्राची लाडकी वहिणी जिनिलिया सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकतंच जिनिलिया हिनं इन्स्टाग्राम एक खास पोस्ट केली आहे. जिनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
जिनिलिया देशमुखने सोशल मीडियावर निगेलसाठी पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच जिनिलियाने निगेल आणि तिचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जिनिलिया आणि निगेल दोघेही अगदी गोड दिसत आहे. निगेल हा जिनिलियाचा धाकटा भाऊ आहे. जिनिलियाच्या लाडक्या भावाचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे जिनिलिया भावूक झाल्याचं दिसून आलं.
आज निगेलच्या वाढदिवशी जिनिलियानं लिहलं, "ॲपल ऑफ माय आय असणारा माझा छोटा निगु पिगु..एक मोठा, जबाबदार, हुशार, स्वयंनिर्मित माणूस आता झाला आहेस. जो आता माझी काळजी घेतो. परंतु यात एक गोष्ट कायम तशीच राहिलं, ती म्हणजे तू माझा निगु पिगु आहेस आणि मी आयुष्यभर तुझी मोठी बहीण असणार आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. स्वप्न पाहत राहा... कारण तु तुमची सर्व स्वप्ने साकार करतोस आणि हीच तुझी सर्वांत खास गोष्ट आहे". जिनिलियाच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत.
जिनिलियाच्या माहेरच्या मंडळींविषयी...
जिनिलियाच्या माहेरी तिचे आईवडील आणि भाऊ-वहिनी आहेत. निल डिसुजा हे तिच्या वडिलांचे तर जेनेट डिसुजा हे आईचे नाव आहे. जिनिलियाच्या भावाचे नाव निगेल असे आहे. निगेल हा एक पत्रकार आहे. तर निगेलने लग्न पंजाबी तरुणीसोबत विवाह केला आहे. जिनिलिया आणि निगेलमध्ये खूप खास बॉन्डिंग आहे. जिनिलिया कायम आपल्या भावासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रेम व्यक्त करत असते.