'बिंधास्त' हिट सिनेमानंतरही मराठीत कामच मिळालं नाही..., गौतमी गाडगीळने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:54 IST2026-01-17T13:52:41+5:302026-01-17T13:54:01+5:30

मराठीतील निर्माते, दिग्दर्शकांबद्दल गौतमी म्हणाली...

gautami gadgil kapoor expressed disappointment as after bindhaast hit marathi movie she didnt got work in marathi | 'बिंधास्त' हिट सिनेमानंतरही मराठीत कामच मिळालं नाही..., गौतमी गाडगीळने व्यक्त केली खंत

'बिंधास्त' हिट सिनेमानंतरही मराठीत कामच मिळालं नाही..., गौतमी गाडगीळने व्यक्त केली खंत

अभिनेत्री गौतमी गाडगीळ कपूर सर्वांच्याच परिचयाची आहे. मराठीतला ब्लॉकबस्टर सस्पेन्स थ्रिलर सिनेमा 'बिंधास्त'मध्ये तिने काम केलं होतं. तिच्यासोबत शर्वरी जेमिनीस दिसली होती. आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. गौतमीने हिंदी मालिका, सिनेमांमध्येही काम केलं. नंतर तिने राम कपूरसोबत लग्न केलं आणि ती संसारात रमली. 'बिंधास्त' सारखा हिट सिनेमा देऊनही गौतमी पुन्हा मराठीत का दिसली नाही? याचं उत्तर तिने नुकतंच एका मुलाखतीत दिलं.

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत गौतमी म्हणाली, "१९९९ साली आलेला बिंधास्त माझा पहिला मराठी सिनेमा होता. तो पहिला असा मराठी सिनेमा ज्याने १०० कोटींपेक्षा जास्त कमावले. पाथ ब्रेकिंग सिनेमा होता. त्याची पब्लिसिटीही गेमचेंजर होती. मुंबईत सगळीकडे आमचे होर्डिंग्स लावले होते. सिनेमात सगळ्या महिलाच होत्या. सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स मोडले. नंतर मी निर्मात्यांच्या घरी जाऊन, सेटवर जाऊनही काम मागितलं. मला काम द्या म्हणाले. पण का काय माहित त्यानंतरही मला कोणी मराठी सिनेमाची ऑफर दिली नाही."

ती पुढे म्हणाली, "तोपर्यंत मी हिंदीतही काम केलं होतं. त्यामुळे एक अफवा पसरलेली की गौतमी फक्त हिंदीतच काम करते. पण तसं काहीच नव्हतं. मला मराठीतही काम करायचं होतं.  मी सिनेमात खूप चांगलं काम केलं होतं. तो खूप छान सिनेमा होता. दोन मुलींची ती गोष्ट होती आणि त्यातली एक मुलगी मी होते. पण नंतर मला एकही संधी मिळाली नाही. मी मराठी निर्माते, दिग्दर्शकांना भेटायचे आणि सांगायचे की प्लीज मला काम द्या."

'घर एक मंदिर' या हिंदी मालिकेमुळे गौतमी घराघरात पोहोचली. ती हिंदीत सक्रिय झाली. याच मालिकेच्या सेटवर तिची राम कपूरसोबत ओळख झाली. त्यांच्यात प्रेम फुललं आणि ते लग्नबंधनाच अडकले. त्यांच्या लग्नाला २५ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्यांना 'सिया' ही मुलगी आणि 'अक्स' हा मुलगा आहे. गौतमी नुकतीच 'दे दे प्यार दे २'मध्ये दिसली. 

Web Title : 'बिंधास्त' हिट के बाद भी गौतमी गाडगिल को मराठी में काम नहीं मिला, जताया दुख।

Web Summary : 'बिंधास्त' की सफलता के बावजूद, गौतमी गाडगिल कपूर ने खुलासा किया कि उन्हें मराठी फिल्म के प्रस्ताव पाने के लिए संघर्ष करना पड़ा। अफवाहों और हिंदी भूमिकाओं पर ध्यान केंद्रित करने से उनके मराठी करियर में बाधा आई।

Web Title : Gautami Gadgil laments lack of Marathi film roles after 'Bindhast' hit.

Web Summary : Despite the success of 'Bindhast,' Gautami Gadgil Kapoor reveals she struggled to get Marathi film offers. Rumors and a focus on Hindi roles hindered her Marathi career, even after actively seeking opportunities.