अशा सजल्या आहेत शर्वरी वाघच्या घरच्या गौराई, सोशल मीडियावर शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 14:09 IST2024-09-12T14:06:26+5:302024-09-12T14:09:48+5:30
शर्वरी वाघने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत तिच्या घरातील गौराईची झलक दाखवली आहे.

अशा सजल्या आहेत शर्वरी वाघच्या घरच्या गौराई, सोशल मीडियावर शेअर केले फोटो
Sharvari Wagh : देशभरात गणेशाचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साह, जल्लोषाने वातावरण भारावून गेले आहे. लाडक्या गणरायापाठोपाठ मंगळवारी सायंकाळी घराघरांमध्ये गौराईचं स्वागत करण्यात आलं. सर्वसामान्यांसह कलाकार मंडळींही त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री शर्वरी वाघच्या घरी गौराईचं आगमन झाल्याचं पाहायला मिळतंय.
शर्वरी वाघने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत तिच्या घरातील गौराईची झलक दाखवली आहे. शर्वरीच्या घरी गौराईच्या स्वागतासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. शर्वरीच्या घरच्या गौराई पारंपरिक रुपात पाहायला मिळाल्या. त्यांना नेसवलेली साडी, हार, सजावट याचीही झलक या फोटोंमधून दिसत आहे.
शर्वरी ही मराठमोळी आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची ती नात आहे. मनोहर जोशी यांची लेक नम्रता वाघ यांची ती मुलगी आहे. तिचे वडील शैलेश वाघ हे मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आहेत. आज तिचं बॉलिवूडमध्ये नाव असलं तरी तिचं महाराष्ट्रीयन प्रेम कायम आहे. शर्वरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती आगामी 'अल्फा' सिनेमात दिसणार आहे. यशराज फिल्म्सच्या या सिनेमात ती आलिया भटसोबत अॅक्शन भूमिकेत आहे.
शर्वरीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर ती अभिनेता विकी कौशलचा भाऊ व कतरिना कैफचा दीर सनी कौशलला डेट करत असल्याच्याही खूप चर्चा आहेत. सनी व शर्वरी अनेक कार्यक्रमांना सोबत हजेरी लावतात, तसेच ते एकत्र वेळ घालवतानाही दिसतात. पण त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिलेली नाही, त्यामुळे या चर्चांबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.