गौरी सुरू करणार डिझायनिंग स्टुडिओ४४ वर्षीय गौरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:35 IST2016-01-16T01:17:10+5:302016-02-06T10:35:47+5:30

गौरी सुरू करणार डिझायनिंग स्टुडिओ ४४ वर्षीय गौरी खान म्हणजे पुर्वाश्रमीची गौरी चिब्बर. दिल्लीत वाढलेली. ती म्हणते चैनीच्या, सुखाच्या ...

Gauri to launch Gauri, 44-year-old designing studio ... | गौरी सुरू करणार डिझायनिंग स्टुडिओ४४ वर्षीय गौरी...

गौरी सुरू करणार डिझायनिंग स्टुडिओ४४ वर्षीय गौरी...

री सुरू करणार डिझायनिंग स्टुडिओ
४४ वर्षीय गौरी खान म्हणजे पुर्वाश्रमीची गौरी चिब्बर. दिल्लीत वाढलेली. ती म्हणते चैनीच्या, सुखाच्या आयुष्याची तिची व्याख्या आता बदलली आहे. शाहरुख खानशी विवाह झाल्यावर आणि नवनवीन आव्हाने पेलायला शिकल्यावर आयुष्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन आता जरा वेगळा आहे. आपण तरुण असतो तेव्हा आयुष्याबद्दल आपल्या कल्पना निराळया असतात. म्हणजे आपल्याला हव्या असणार्‍या वस्तू घेता याव्यात असे आपले स्वप्न असते. आपली स्वत:ची एखादी सुंदर कार असावी. आयुष्याच्या या वळणावर या कल्पना मागे पडतात. आयुष्य कसे असावे, कसे जगावे याचा विचार या टप्प्यावर केला जातो.
काही नवनवीन करण्यावर भर असतो. आमच्या मुलांनीही सामान्य जीवन जगण्यापेक्षा काही तरी वेगळे आयुष्य जगावे, यावर आमचा भर असेल. मन्नत या बंगल्यातील सजावटीकडे गौरी हिने खास लक्ष दिले आहे. तिची ती आवड आहे. आयुष्याविषयी तिचे आपले स्वत:चे काही नियम आहेत. गौरीने सप्टेंबरमध्ये पॅरिसचा दौरा केला. या वेळी तिने तेथील नावाजलेल्या प्रदर्शनांना हजेरी लावली. यावेळी तिने घोषणा केली की, आगामी जानेवारीत आयोजित प्रदर्शनात ती फर्निचरची विशेष मालिका सादर करणार आहे. ती पती आणि मित्रांसोबत स्वत:चा डिझाईन स्टुडिओ सुरू करणार आहे. मागील वर्षी शाहरुखला दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. त्याच्याकडील संपत्तीचा अंदाजित आकडा ६00 दशलक्ष डॉलर एवढा आहे.

Web Title: Gauri to launch Gauri, 44-year-old designing studio ...