‘मिसेस खान’चे ग्लॅमरस फोटो; फॅशन मॅगझिनसाठी गौरी खानने केले बोल्ड फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 15:02 IST2021-03-24T15:02:03+5:302021-03-24T15:02:47+5:30

या फोटोशूटची बात काही औरच...! गौरीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

gauri khan wife of shahrukh khan Bold photoshoot for a leading magazine | ‘मिसेस खान’चे ग्लॅमरस फोटो; फॅशन मॅगझिनसाठी गौरी खानने केले बोल्ड फोटोशूट

‘मिसेस खान’चे ग्लॅमरस फोटो; फॅशन मॅगझिनसाठी गौरी खानने केले बोल्ड फोटोशूट

ठळक मुद्देगौरी खान पॉप्युलर स्टार वाईफसोबतच निर्माती आणि फेमस इंटीरियर डिजाइनरसुद्धा आहे.

शाहरूख खान म्हणायला बॉलिवूडचा किंगखान. पण सध्या हा किंगखान नाही तर त्याची पत्नी गौरी खान चर्चेत आहे. होय, गौरीच्या नव्या फोटोशूटचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. यात गौरीचा बोल्ड अवतार पाहायला मिळतोय.

The Peacock  या फॅशन मॅगझिनसाठी गौरीने हे फोटोशूट केले आहे. या फोटोत गौरी अ‍ॅनिमल प्रिंटच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय. याआधीही गौरीने अनेक मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. पण या फोटोशूटची बात काही औरच.

गौरी 14 वर्षांची आणि शाहरूख 19 वर्षांचा असताना त्यांची प्रथम नजरानजर झाली होती. शाहरूखने गौरीला पाहिले आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला होता. मग गौरी हीच जणू शाहरूखचा ध्यास बनली होती. त्याने गौरीसमोर स्वत:चे प्रेम व्यक्त केले.

सुरुवातीला गौरी नकार देत राहिली. पण शाहरूखचे खरे प्रेम पाहून ती त्याच्यापासून फार काळ दूर राहू शकली नाही आणि मग सुरु झाली एक प्रेम कहाणी.

25 आॅक्टोबर 1991 मध्ये अतिशय कमी लोकांच्या उपस्थित लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला सुरुवातीला गौरीच्या घरातून विरोध होता. पण कालांतराने हा विरोध मावळला. गौरी खान पॉप्युलर स्टार वाईफसोबतच निर्माती आणि फेमस इंटीरियर डिजाइनरसुद्धा आहे. गौरीने रणबीर कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि वरुण धवनच्या घराचे इंटीरियर केले आहे. गौरीचे नाव फॉर्च्युच्या 50 पावरफुल भारतीय महिल्यांच्या यादीत सामील झाले आहे. 

Web Title: gauri khan wife of shahrukh khan Bold photoshoot for a leading magazine