Gashmeer Mahajani : मराठमोळा गश्मीर महाजनी आणि काजोलचा 'रोमॅंटिक सीन', चाहते म्हणतात 'शाहरुखपेक्षा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 15:19 IST2022-11-27T15:17:27+5:302022-11-27T15:19:39+5:30
मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीने 'झलक दिख ला जा'च्या स्टेजवर काजोलसोबत 'डीडीएलजे'चा डायलॉग म्हणला. मग काय थेट शाहरुखसोबतच त्याची तुलना व्हायला लागली.

Gashmeer Mahajani : मराठमोळा गश्मीर महाजनी आणि काजोलचा 'रोमॅंटिक सीन', चाहते म्हणतात 'शाहरुखपेक्षा...
DDLJ दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि शाहरुख काजोलची जोडी एव्हरग्रीन आहे. हा सिनेमा किती वेळाही पाहिला तरी कंटाळा येत नाही. कित्येक जण ट्रेन चा Scene सीन recreate रिक्रिएट करत असतात. या सिनेमातील एखादा dialogue डायलॉगच शाहरुख किंवा काजोलसमोर म्हणता आला तर..? काय मजा येईल. मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीने झलक दिख ला जा च्या स्टेजवर काजोलसोबत डीडीएलजे चा डायलॉग म्हणला. मग काय थेट शाहरुखसोबतच त्याची तुलना व्हायला लागली.
Romantic scene गश्मीर आणि काजोलचा रोमॅंटिक सीन
गश्मीर महाजनी ने आपल्या अभिनयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. त्याने इतक्या सुंदर पद्धतीने सीन रिक्रिएट केला की सेटवर पूर्ण शांतता पसरली. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चा छोटे छोटे शहरो मे बडी बडी बातें होती रहती है हा डायलॉग ऐकून सर्वच खुश झाले. अगदी तसेच हावभाव, शाहरुखसारखीच बोलण्याची तऱ्हा बघुन काजोलही शॉक झाली. स्टेजवर दिग्दर्शक करण जोहरही होता.
हा व्हिडिओ बघून चाहतेही गश्मीर महाजनीचे कौतुक करत आहेत. इतकेच नाही तर शाहरुखसोबत गश्मीरची तुलनाही होऊ लागली आहे. काही जणांनी तर शाहरुखपेक्षा छान केले असे म्हणले आहे. गश्मीरला बॉलिवुडमध्ये चांगली संधी दिली पाहिजे, करण जोहरने त्याला लॉंच करावे अशा कमेंट केल्या आहेत. तर काजोल सध्या तिचा आगामी चित्रपट सलाम व्हेंकीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.