पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार Tiger Shroffचा गणपत?, अॅडव्हॅन्स बुकिंगचा आकडा आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 17:14 IST2023-10-18T16:54:42+5:302023-10-18T17:14:51+5:30
अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सनॉन ही जोडी 'हिरोपंती'नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.

पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार Tiger Shroffचा गणपत?, अॅडव्हॅन्स बुकिंगचा आकडा आला समोर
अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) ही जोडी 'हिरोपंती'नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. विकास बहल दिग्दर्शित 'गणपत' चित्रपटात हे दोघेही वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान चित्रपटाला घेऊन चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. त्यामुळे पहिल्यादिवशी सिनेमा चांगली कमाई करु शकतो असा अंदाज ाहे.
पूजा एण्टरटेन्मेंट्सची निर्मिती असलेल्या गणपतमध्ये टायगर श्रॉफ अॅक्शन आणि दमदार स्टंट करताना दिसणार आहेत. त्यामुळे या सिनेमाला घेऊन तरुणवर्गामध्ये चांगलीच क्रेझ आहे. सिनेमाच्या अॅडव्हॅन्स बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसर सिनेमाच्या २ वर्जनची आतापर्यंत २ हजार ५९० तिकिटांचं अॅडव्हॅन्स बुकिंग झालं आहे. हा सिनेमा १४७८ स्क्रिनवर एकाच वेळी रिलीज करण्यात येणार आहे. आकड्यांनुसार आतापर्यंत ९ कोटींपेक्षा जास्त कमाई अॅडव्हॅन्स बुकिंगमधून या सिनेमा केली आहे.
हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्येही हा चित्रपट रिलीज होणार आहे. विकास बहलने दिग्दर्शनासोबतच वासु भगनानी, दिपशीखा देशमुख आणि जॅकी भगनानी यांच्या साथीने 'गणपत'ची निर्मितीही केली आहे.