'किती दिवस तोंड लपवून पळशील'; गणरायाची मुर्ती घेण्यासाठी गेलेला राज कुंद्रा ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 14:08 IST2022-08-30T14:08:08+5:302022-08-30T14:08:44+5:30
Raj kundra troll: गणरायाची मुर्ती आणायला गेलेला शिल्पाचा पती राज कुंद्रा सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.

'किती दिवस तोंड लपवून पळशील'; गणरायाची मुर्ती घेण्यासाठी गेलेला राज कुंद्रा ट्रोल
सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ३१ ऑगस्टला गणेशोत्सव असल्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाच्या घरी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. यात अनेक सेलिब्रिटींच्या घरी दरवर्षी बाप्पाचं आगमन होतं. यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी तर मोठ्या धुमधडाक्यात बाप्पाला घरी आणते. मात्र, दरवर्षीप्रमाणे यावेळी गणरायाची मुर्ती आणायला गेलेला शिल्पाचा पती राज कुंद्रा सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.
प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर राज कुंद्राचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राज गणपतीच्या कारखान्यात बाप्पाची मुर्ती घ्यायला गेल्याचं दिसून येत आहे. मात्र, यावेळी त्याने संपूर्ण चेहरा झाकला जाईल अशा पद्धतीचा मास्क घातला होता. जो पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.
राजच्या चेहऱ्यावरचा मास्क पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला पॉर्न चित्रपट तयार करण्याच्या प्रकरणावरुन ट्रोल केलं आहे. 'तोंड दाखवायची लाज वाटते का?', 'किती दिवस तोंड लपवून पळत राहणार?', 'अशी कामच का करायची ज्यामुळे तोंड दाखवायची लाज वाटेल?', अशा कितीतरी कमेंट करत नेटकऱ्यांनी राजला ट्रोल केलं आहे.
दरम्यान, यावेळी राजने पांढऱ्या रंगाचे स्वेटशर्ट आणि जीन्स असा लूक केला होता. तर शिल्पादेखील त्याच्या सोबत होती. मात्र, शिल्पाच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसून आलं.