Sacred Games 2 : पुन्हा परततोय गणेश गायतोंडे! ‘सेक्रेड गेम्स2’चा टीजर रिलीज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 21:47 IST2018-09-21T21:44:13+5:302018-09-21T21:47:35+5:30
प्रेक्षकांच्या या मागणीखातर निर्मात्यांनी ‘सेक्रेड गेम्स’चे दुसरे सीझन आणण्याचा निर्णय घेतला आणि आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. आज ‘सेक्रेड गेम्स2’चा टीजर रिलीज करण्यात आला.

Sacred Games 2 : पुन्हा परततोय गणेश गायतोंडे! ‘सेक्रेड गेम्स2’चा टीजर रिलीज!!
नेटफ्लिक्सची फर्स्ट ओरिजनल इंडियन सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ प्रचंड गाजली. या वेबसीरिजचे आठ एपिसोड लोकांनी पाहिले आणि अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यामुळेच या सीरिजचा दुसरा भाग कधी एकदा पाहायला मिळतो, असे प्रेक्षकांना झाले होते. पहिली सीरिज संपत नाही, तोच या प्रेक्षक ‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनची आतुरतेने प्रतीक्षा करू लागले होते. केवळ इतकेच नाही तर आम्हाला ‘सेक्रेड गेम्स2’ पाहिजे, अशी मागणी प्रेक्षकांनी लावून धरली होती. परिणामी सोशल मीडियावरही #WeWantSacredGames2 ट्रेंड होऊ लागला होता. याद्वारे ‘सेक्रेड गेम्स’चे दुसरे सीझन आणण्याची मागणी केली गेली होती. प्रेक्षकांच्या या मागणीखातर निर्मात्यांनी ‘सेक्रेड गेम्स’चे दुसरे सीझन आणण्याचा निर्णय घेतला आणि आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. आज ‘सेक्रेड गेम्स2’चा टीजर रिलीज करण्यात आला.
The worst is yet to come. Sacred Games will be back for Season 2. pic.twitter.com/lSBIzQR2b9
— Netflix India (@NetflixIndia) September 21, 2018
पहिल्या सीझनमध्ये गणेश गायतोंडेचा मरताना दाखवले होते. पण ‘सेक्रेड गेम्स2’ तो परतताना दिसतोय. साहजिकचं चाहते खूश आहेत. गणेश गायतोंडे ही भूमिका अभिनेता नवाजुद्दीनने साकारली होती. सैफ अली खान यात मुख्य भूमिकेत होता. आता ‘सेक्रेड गेम्स2’मध्ये गणेश गायतोंडे कसा परततो, हे सगळे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि कुबरा सैत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.