Gadar 2 : सोनाक्षी सिन्हाचा भाऊ तब्बल ५ वर्षांनंतर करतोय रुपेरी पडद्यावर कमबॅक, झळकणार 'गदर २'मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 15:34 IST2023-07-11T15:33:53+5:302023-07-11T15:34:22+5:30
Luv Sinha : लव सिन्हा शेवटचा जेपी दत्ता यांच्या पलटनमध्ये दिसला होता.

Gadar 2 : सोनाक्षी सिन्हाचा भाऊ तब्बल ५ वर्षांनंतर करतोय रुपेरी पडद्यावर कमबॅक, झळकणार 'गदर २'मध्ये
अभिनेता-राजकारणी शत्रुघ्न सिन्हा (Shatrugna Sinha) यांचा मुलगा आणि सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha)चा मोठा भाऊ लव सिन्हा (Luv Sinha) निर्माता-दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या 'गदर २' (Gadar 2)मध्ये पाच वर्षांनंतर एका खास भूमिकेत दिसणार आहे. लव सिन्हा शेवटचा जेपी दत्ता यांच्या पलटनमध्ये दिसला होता; २०१८ मध्ये रिलीज झाला होता. सध्या लव सिन्हा 'गदर २' बद्दल खूप उत्सुक दिसत आहे.
'गदर २' चित्रपटाबाबत लव सिन्हा म्हणतो, 'एवढ्या मोठ्या फ्रँचायझीचा एक भाग बनणे माझ्यासाठी खरोखरच एखाद्या मोठ्या संधीपेक्षा कमी नाही. मी 'गदर' हा चित्रपट अनेकवेळा पाहिला आहे, या चित्रपट फ्रँचायझीमध्ये काम करण्याची संधी मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते. यासाठी मी चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक अनिल शर्मा यांचे आभार मानू इच्छितो. 'गदर' हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्या चित्रपटाचा माझ्यावर बराच काळ प्रभाव राहिला.
अभिनेता लव सिन्हा म्हणतो, 'गदर २च्या रिलीजची सर्वांनाच खूप प्रतीक्षा आहे, मग ते चित्रपटात काम करणारे कलाकार असोत, तंत्रज्ञ असोत किंवा सामान्य प्रेक्षक असोत. सनी देओल आणि अमिषा पटेलसोबत या चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूप छान होता. 'गदर'मध्ये त्याचे काम पूर्ण झाले आहे, आता तो 'गदर २'मध्येही त्याच उत्साहाने परतत आहे. संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. तो एक समृद्ध आणि रोमांचक अनुभव होता. जे व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत.
लव सिन्हाने अभिनेता म्हणून २०१० मध्ये 'सदियां' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. राज कंवर दिग्दर्शित, लव सिन्हाला या चित्रपटात ऋषी कपूर, रेखा आणि हेमा मालिनी यांसारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. पण हा चित्रपट यशस्वी झाला नाही आणि लव सिन्हाची चित्रपटांतील कारकीर्द अपयशी ठरली.
अभिनेता लव सिन्हा मानतो की त्याला चित्रपटांमध्ये ज्या संधी मिळायच्या आहेत त्या मिळाल्या नाहीत. तो म्हणतो की, 'पलटनमधली लेफ्टनंट अत्तर सिंगची भूमिका माझ्या हृदयाच्या खूप जवळची होती. लोकांना ही व्यक्तिरेखा खूप आवडली पण या चित्रपटानंतर मला ज्या प्रकारचे चित्रपट मिळायला हवे होते तसे मिळाले नाहीत. मला 'गदर २' कडून खूप आशा आहेत.