'हिंदुस्थान झिंदाबाद'च्या घोषणा देत 'गदर-2' नं इतिहास रचला, 15 ऑगस्टला जमावला इतक्या कोटींचा गल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 09:05 AM2023-08-16T09:05:00+5:302023-08-16T09:14:27+5:30

15 ऑगस्टला गदर २ ने हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक नवा विक्रम केला आहे.

Gadar 2 box office collection day 5 biggest independence day for a movie in the history of indian cinema | 'हिंदुस्थान झिंदाबाद'च्या घोषणा देत 'गदर-2' नं इतिहास रचला, 15 ऑगस्टला जमावला इतक्या कोटींचा गल्ला!

'हिंदुस्थान झिंदाबाद'च्या घोषणा देत 'गदर-2' नं इतिहास रचला, 15 ऑगस्टला जमावला इतक्या कोटींचा गल्ला!

googlenewsNext

बहुचर्चित ‘गदर २’ हा बॉलिवूड सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सनी देओलच्या २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. तब्बल २२ वर्षांनी या सुपरहिट सिनेमाच्या सीक्वेलसाठी प्रेक्षकही आतुर होते. टीझरपासूनच ‘गदर २’ चर्चेत होता. अखेर ११ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवसापासूनच ‘गदर २’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.  15 ऑगस्ट रोजी हिंदी चित्रपटांच्या इतिहासात एक नवा विक्रम केला आहे. 15 ऑगस्ट यादिवशी देशातील चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही हिंदी चित्रपटाने इतकी कमाई केलेली नाही इतकी 'गदर २' ने केली.


'गदर 2'साठी मंगळवार हा ऐतिहासिक दिवस ठरला. सोमवारी रात्री चित्रपटाचे सक्सेस सेलिब्रेट करणाऱ्या स्टार्ससाठी दुसरा दिवस आणखी एका सेलिब्रेशनमध्ये बदलला. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, चित्रपटाने 15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर पाचव्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईसह, 'गदर 2' चित्रपटाचे देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन आता 228.58 कोटी रुपयांवर गेले आहे.


15 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या फक्त हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, 'गदर 2'च्या कमाईच्या जवळपास कोणताही चित्रपट आला नाही. सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांचा 'शोले' हा चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला होता.  'शोले' चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यापासून कमाईचा वेग पकडला आणि त्यानंतर तो ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.

‘गदर २’ चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका आहेत. अभिनेता उत्कर्ष शर्माने चित्रपटात तारा सिंहच्या मुलाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Gadar 2 box office collection day 5 biggest independence day for a movie in the history of indian cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.