'आजपासून, आम्ही एक आहोत'; रणदीप हुड्डा 'लीन' झाला, लग्नाचा पहिला फोटो आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 00:03 IST2023-11-30T00:02:42+5:302023-11-30T00:03:31+5:30
randeep hooda lin laishram wedding Photoes: मणिपूरच्या इंम्फाळमध्ये पारंपारिक मणिपुरी पोशाखात दोघांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या काही तासांनी रणदीप हुड्डाने हे फोटो पोस्ट केले आहेत.

'आजपासून, आम्ही एक आहोत'; रणदीप हुड्डा 'लीन' झाला, लग्नाचा पहिला फोटो आला
अखेर प्रतीक्षा संपली आहे, रणदीप हुड्डाने लाँग टाइम गर्लफ्रेंड लीन लॅशरामसोबतच्या त्याच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मणिपूरच्या इंम्फाळमध्ये पारंपारिक मणिपुरी पोशाखात दोघांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या काही तासांनी रणदीप हुड्डाने हे फोटो पोस्ट केले आहेत. आजपासून, आम्ही एक आहोत, असे कॅप्शन या फोटोंना दिले आहे.
या पोशाखात लीन ही एका सिनेमातल्या राजकुमारीसारखी नटली होती. लग्नानंतर हुड्डा हरियाणाला परतणार आहे. तिथे रिसेप्शन असणार आहे. अद्याप याबाबत काही माहिती आलेली नाहीय. मुंबईत देखील रिसेप्शन असण्याची शक्यता आहे.
कोण आहे लीन...
रणदीप आणि लीन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. लीन मूळची मणिपूरमधील इंफाळ येथील असून ती मॉडेल, अभिनेत्री आणि यशस्वी बिझनेस वूमनदेखील आहे. तिने प्रियांका चोप्राच्या 'मेरी कॉम' या सिनेमात काम केलं आहे. तसंच तिने 'रंगून', 'उमरिका' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर शाहरुखच्या ओम शांती ओम या सिनेमातही तिने स्क्रीन शेअर केली आहे. अलिकडेच ती करिना कपूरच्या 'जाने जान' या सिनेमात झळकली.