'बॉलीवूडचा नवा 'लव्ह ट्रँगल'! रोहित सराफ, राशा थडानी अन् नितांशी गोयल एकत्र झळकणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:27 IST2026-01-22T13:26:57+5:302026-01-22T13:27:59+5:30
तरुणाईंंमध्ये विशेषत: जेनझींमध्ये लोकप्रिय असलेले हे कलाकार एकत्र येणार?

'बॉलीवूडचा नवा 'लव्ह ट्रँगल'! रोहित सराफ, राशा थडानी अन् नितांशी गोयल एकत्र झळकणार?
बॉलिवूडमध्ये लव्ह ट्रँगलवर आधारित अनेक सिनेमे आले. 'कुछ कुछ होता है', 'दिल तो पागल है', 'कॉकटेल' अशी सिनेमांची यादीच आहे. आता जेन झींना आकर्षित करण्यासाठी बॉलिवूडमध्ये फ्रेश त्रिकुट पाहायला मिळू शकतं. रोहित सराफ, राथा थडानी आणि नितांशी गोयल हे तरुण कलाकार आगामी सिनेमात झळकणार असल्याची चर्चा आहे. हा फ्रेश लव्हट्रँगल पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
मिड डे रिपोर्टनुसार, 'नीरजा' फेम निर्माते अतुल कसबेकर आणि तनुज गर्ग सध्या रोहित, राशा आणि नितांशी तिघांशी चर्चा करत आहेत. ही एक रोमँटिक लव्हस्टोरी असणार आहे. रिलेशनशिपमधील भाव-भावना, संघर्ष, जिद्द दाखवणारी अशी ही प्रेमकहाणी असणार आहे. निर्मात्यांची कलाकारांशी सुरु असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात असल्याचंही कळत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन कोण करणार यावरही अजून चर्चा सुरु आहे. तसंच सिनेमा फक्त ओटीटी नाही तर थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची योजना आहे. लवकरच या प्रोजेक्टची अधिकृत घोषणाही होणार आहे.
रोहित सराफ 'मिसमॅच्ड' सीरिजमुळे तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. 'चॉकलेट बॉय', 'रोमँटिक हिरो' अशी त्याची प्रतिमा आहे. तर राशा थडानी आणि नितांशी गोयल दोघीही जेन झींच्या आवडत्या अभिनेत्री आहेत. राशाने 'आजाद' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर नितांशीचं 'लापता लेडीज'मधील अभिनयामुळे खूप कौतुक झालं. ती फक्त १८ वर्षांची आहे.