सुश्मिता सेनच्या वहिनीचा डिलिव्हरी रूममधील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 18:02 IST2022-05-08T18:01:58+5:302022-05-08T18:02:11+5:30
Charu asopa : व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चारु हॉस्पिटलमध्ये असून ती डिलिव्हरीसाठी जाण्यास सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे.

सुश्मिता सेनच्या वहिनीचा डिलिव्हरी रूममधील व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची( sushmita sen) वहिनी आणि लोकप्रिय अभिनेत्री चारु असोपा ( charu asopa) गेल्या काही काळापासून कलाविश्वापासून दूर आहे. ६ महिन्यांपूर्वी चारुने एका चिमुकल्या मुलीला जन्म दिला. या चिमुकलीचं नाव जियाना असं असून सध्या चारु तिच्या संगोपनामध्येच बिझी आहे. कलाविश्वापासून दूर असलेली चारु सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या लेकीसंदर्भातले व्हिडीओ पोस्ट करत असते. चारुप्रमाणेच तिचा नवरा व सुश्मिताचा भाऊ राजीव सेनदेखील युट्यूबर असून त्याच्या युट्यूब चॅनेलवर तो डेली व्हॉल्ग्स शेअर करत असतो. यामध्येच राजीवने चारुचा डिलिव्हरी रुममधील व्हिडीओ शेअर केला आहे.
सध्या सोशल मीडियावर चारुचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आल आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून यात चारु डिलिव्हरी रुममध्ये असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये चारुचा डिलिव्हरी पॅकिंगपासून ते डिलिव्हरी रुमपर्यंत प्रत्येक गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ राजीवने शूट करुन शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चारु हॉस्पिटलमध्ये असून ती डिलिव्हरीसाठी जाण्यास सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. यात तिच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नाहीये. उलटपक्षी ती हे सगळे क्षण एन्जॉय करत आहे.
दरम्यान, चारु आणि राजीवने २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली. अन्य सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांचाही विवाहसोहळा चांगलाच चर्चिला गेला होता. मध्यंतरी चारू आणि राजीव विभक्त होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चांचं त्यांनी खंडण केलं आहे.