SHOCKING! अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या, ‘ती’ डिलीट केलेली पोस्ट दुर्दैवाने खरी ठरली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 14:55 IST2021-01-25T14:53:51+5:302021-01-25T14:55:25+5:30
डिप्रेशनसोबतचा तिचा लढा अखेर अपयशी ठरला.

SHOCKING! अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या, ‘ती’ डिलीट केलेली पोस्ट दुर्दैवाने खरी ठरली!!
गेल्यावर्षी जुलै महिन्यात जग सोडून जात असल्याची पोस्ट टाकून खळबळ उडवणारी अभिनेत्री जयश्री रामय्या हिने अखेर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत करत मृत्यूला कवटाळेच. डिप्रेशनसोबतचा तिचा लढा अखेर अपयशी ठरला. दीर्घकाळापासून डिप्रेशनशी लढत असलेल्या जयश्रीचा मृतदेह सोमवारी सकाळी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.
बेंगळुरू येथे एका आश्रमात जयश्रीने गळफास लावून आयुष्य संपवले. नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
बंगळुरूच्या संध्या किराना आश्रमात जयश्री रामय्यावर उपचार सुरू होते. सोमवारी ती कुणाचाही फोन उचलत नसल्याचे तसेच मेसेजला उत्तर देत नसल्याचे तिच्या नातेवाईक आणि मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ती ज्या आश्रमात उपचार घेत होती, त्यांच्याशी संपर्क साधला. आश्रमातील लोकांनी तिच्या खोलीत जाऊन बघितले असता ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली.
बिग बॉस कन्नडच्या तिस-या सीझनमध्ये जयश्री रामय्या सहभागी झाली होती. अभिनयाच्या क्षेत्रात योग्य संधी मिळाली नाही, यामुळे ती डिप्रेशनमध्येगेली होती.
जुलैमध्ये शेअर केली आत्महत्येबद्दलची धक्कादायक पोस्ट
जयश्री रामय्या दीर्घकाळापासून नैराश्यात होती. गेल्यावर्षी 22 जुलैला तिने सोशल मीडियावर आत्महत्या करत असल्याची पोस्ट लिहून खळबळ निर्माण केली होती. फेसबुकवर आपण जग सोडत असल्याची पोस्ट तिने शेअर केली होती. ‘मी जातेय. गुडबॉय टू धीस *** वर्ल्ड अॅण्ड डिप्रेशन...,’ अशी तिची पोस्ट होती. तिची पोस्ट बघून सगळ्यांनाच धक्का बसला होता. यानंतर लगेचतिच्या काही मित्रांनी तिच्या घराकडे धाव घेतली होती.
नशिबाने जयश्री सुरक्षित होती. यानंतर जयश्रीने जग सोडून जात असल्याची पोस्ट डिलीट केली होती. शिवाय एक नवी पोस्ट टाकत आपण सुरक्षित असल्याचे सांगितले होते.