थंडगार पाण्यात उडी मारण्यास केले मजबूर; मग बॉबी देओलने धारण केला असा लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 20:59 IST2018-05-02T15:29:30+5:302018-05-02T20:59:40+5:30

सध्या ‘रेस-३’ची शूटिंग सुरू असून, सर्व कलाकार मस्तीत शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. कलाकारांच्या धमाल मस्तीचा असाच एक व्हिडीओ समोर येत आहे.

Forced to jump in cold water; Then Bobby Deol has caught Luke! | थंडगार पाण्यात उडी मारण्यास केले मजबूर; मग बॉबी देओलने धारण केला असा लूक!

थंडगार पाण्यात उडी मारण्यास केले मजबूर; मग बॉबी देओलने धारण केला असा लूक!

लिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा मोस्ट अवेटेड ‘रेस-३’ या चित्रपटाची शूटिंग अजूनही सुरूच आहे. चित्रपटातील एका गाण्याची शूटिंग करण्यासाठी संपूर्ण टीम लडाख येथे पोहोचली असून, त्याठिकाणी ते चांगलीच मौजमस्ती करताना दिसत आहेत. अशात ‘रेस-३’मधील सहायक अभिनेता बॉबी देओलला एक असा लूक देण्यास भाग पाडले जो दिग्दर्शक रेमो डिसूझा याची डिमांड होती. बॉबी देओलला डोंगराळ भागात असलेल्या अन् बर्फाने गोठलेल्या अतिशय थंड पाण्याच्या तळ्यात उडी मारण्यास सांगितले. बॉबीचा हा सीन शूट केला जाणार होता. बॉबीनेही दिग्दर्शकाला नाराज न करता हा लूक देण्यास समर्थता दर्शविली. परंतु त्यासाठी त्याने असा काही गेटअप धारण केला, जे बघून सेटवरील सर्वांनाच हसू आवरणे अवघड झाले होते. 

बॉबीने त्याचा हा लूक त्याच्या आॅफिशियल इन्स्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केला. बॉबीने लाल रंगाचे शर्ट आणि खाली पॅण्टऐवजी टॉवेल गुंडाळून घेतला होता. एवढेच काय तर त्याने गेटअपवर काळ्या रंगाचा शूजही घातला. या लूकमधील त्याने त्याचा एक फोटो क्लिक करून तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘रेस-३ चा नवा लूक... जेव्हा रेमो डिसूझाने एक परफेक्ट शॉटसाठी थंडगार पाण्यात उडी मारण्यास भाग पाडले.’
 

‘रेस-३’मध्ये सुपरस्टार सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तोरानी द्वारा निर्मित या चित्रपटाला टिप्स फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत बनविले जात आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करीत आहे. हा चित्रपट याचवर्षीच्या ईदच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच १५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Forced to jump in cold water; Then Bobby Deol has caught Luke!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.