पायाला फ्रॅक्चर असतानाही वॉकर घेऊन शूटिंगस्थळी पोहोचली ‘ही’ अभिनेत्री, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 18:59 IST2018-04-01T13:29:06+5:302018-04-01T18:59:14+5:30
पायाला दुखापत असतानाही या अभिनेत्रीने वॉकर घेऊन शूटिंगचे ठिकाण गाठले. याबाबतचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पायाला फ्रॅक्चर असतानाही वॉकर घेऊन शूटिंगस्थळी पोहोचली ‘ही’ अभिनेत्री, पाहा व्हिडीओ!
ब ग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करिमीने रविवारी तिचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तिच्या पायाला दुखापत असतानाही ती शूटिंग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातीलच एका रिसॉर्टमधील आहे. ज्याठिकाणी मंदाना डिझायनर सोनाक्षी राजबरोबर फोटोशूट करीत आहे. व्हिडीओमध्ये मंदाना व्हाइट आणि सिल्वर रंगाच्या फुल लेण्थ गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर पायाला दुखापत असल्याने ती वॉकरचा आधार घेऊन चालत असल्याचेही दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मंदानाने लिहिले की, ‘प्रत्येक प्रसंगात स्वत:ला चांगले दाखविण्यासाठी आपल्या बुद्धीला तल्लख ठेवा.’
दरम्यान, आठवडाभरापूर्वी मंदानाला मुंबई येथील एका रेस्टॉरंटबाहेर वॉकरच्या मदतीने चालताना बघण्यात आले होते. याबाबतचा खुलासा करताना मंदानाने एक फोटो शेअर करीत लिहिले होते की, पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे वॉकरचा आधार घेत आहे. २६ वर्षीय मंदाना करिमी बिग बॉसच्या नवव्या सीजनमुळे चर्चेत आली. याव्यतिरिक्त तिने ‘रॉय, भाग जॉनी, मैं और चाल्स, क्या कूल हैं हम-३’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
गेल्या काहीकाळापासून ती पडद्यावरून गायब झाली असली तरी, सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहणे पसंत करते.