‘फनलव्हिंग’ नव्या नवेलीसोबतचा ‘तो’ मिस्ट्री बॉय आहे ‘या’ अभिनेत्याचा मुलगा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 12:06 IST2017-07-13T06:36:16+5:302017-07-13T12:06:16+5:30
अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा अलीकडे एका मिस्ट्री बॉयसोबत दिसली होती. नव्या नवेली तर बिनधास्त होती. पण तिच्यासोबत ...

‘फनलव्हिंग’ नव्या नवेलीसोबतचा ‘तो’ मिस्ट्री बॉय आहे ‘या’ अभिनेत्याचा मुलगा!
अ िताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा अलीकडे एका मिस्ट्री बॉयसोबत दिसली होती. नव्या नवेली तर बिनधास्त होती. पण तिच्यासोबत असलेला मिस्ट्री बॉय मात्र मीडियाच्या कॅमे-यांसमोर आपला चेहरा लपवतांना दिसला होता. चक्क स्वत:च्या टी-शर्टने चेहरा लपवतानाचे त्याचे नव्यासोबतचे फोटो व्हायरल झाले होते. पण चेहरा लपवलेला नव्याचा हा मित्र कोण? हे मात्र उघड झाले नव्हते.
![]()
पण शेवटी मीडियापासून लपवता लपत नाही. होय, नव्यासोबत त्यादिवशी मुव्ही डेट एन्जॉय करणारा व मीडियाला पाहून चेहरा लपवणारा तो मिस्ट्री बॉय दुसरा कुणी नसून अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिजान होता. होय, नव्या आणि मिजान एकाच फ्रेन्ड सर्कलमधील आहेत. दोघेही गेल्या काही काळापासून एकमेकांना ओळखतात. एकमेकांसोबत वेळ घालवणे दोघांनाही आवडते. सध्या नव्या मुंबईत आहे. काही दिवसांनंतर ती शिक्षणासाठी युएसला परत जाणार आहे. त्यामुळे सध्या नव्या व मिजान परस्परांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी दोघांनीही मुव्ही डेट एन्जॉय केली होती. यानंतर ते एका नाईट क्लबमध्ये दिसले होते. आता या दोघांमध्ये काहीतरी खिचडी पकतेय, असा निष्कर्ष काढणे सध्या तरी घाईचे ठरेल. पण दोघांचीही मैत्री जोरात आहे, असे मात्र आपण नक्कीच म्हणू शकू. मिजानच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा सध्या जोरात आहे. अर्थात त्याआधीच नव्यासोबतचा ‘मिस्ट्री बॉय’ म्हणून तो प्रसिद्ध झाला आहे. नव्याबद्दल सांगायचे तर १९ वर्षांची नव्या अतिशय स्टाईलिश आहे. त्यामुळेच येत्या काळात ती बॉलिवूडमध्ये दिसली तर नवल वाटायला नको. सोशल मीडियावर नव्या बरीच अॅक्टिव्ह आहे. आपल्या मित्रांसोबत अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नव्याने अलीकडे आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. फनलव्हिंग नव्याला पार्टी करणे अतिशय आवडते.