उडता पंजाबच्या प्रिंटचे रहस्य उलगडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 11:49 IST2016-06-16T06:19:33+5:302016-06-16T11:49:33+5:30
उडता पंजाब हा चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात अडकल्यामुळे या चित्रपटाच्या दृश्यांमध्ये काही बदल करण्यात आले. यासाठी या चित्रपटाची प्रिंट वेगवेगळ्या ...

उडता पंजाबच्या प्रिंटचे रहस्य उलगडले
उ ता पंजाब हा चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात अडकल्यामुळे या चित्रपटाच्या दृश्यांमध्ये काही बदल करण्यात आले. यासाठी या चित्रपटाची प्रिंट वेगवेगळ्या लोकांच्या हातात गेली. यामुळे आता प्रिंट कोणी लीक केली हे सांगणे कठीण असल्याचे या टीममधील मंडळीचे म्हणणे असल्याची चर्चा आहे. सेन्सॉर बोर्डाने काही दृश्यांमध्ये बदल सुचवल्यानंतर ते बदल करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांकडे ही प्रिंट गेली होती. आता प्रिंट लीक झाल्यानंतर कोणाला यासाठी जबाबदार धरायचे हेच टीमला कळत नाहीये. बहुधा याचमुळे बिग बजेट चित्रपट सेन्सॉर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी शेवटपर्यंत थांबतात. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या व्हॉट्स युवर राशी या चित्रपटाच्या बाबतीतही अशीच गोष्ट घडली होती. त्यांच्या चित्रपटाचीही प्रिंट प्रदर्शनापूर्वीच लीक झाली होती. कोणत्याही चित्रपटाची प्रिंट लीक झाल्यानंतर सर्वप्रथम लॅबमध्ये काम करणाऱ्या लोकांची चौकशी केली जाते. पण उडता पंजाबच्या प्रकरणात त्यांच्यावर संशय करण्याचा प्रश्नच नाहीये. ही प्रिंट सेन्सॉरला गेली असता लीक झाल्याची चर्चा आहे.