FITNESS FREAK: जाणून घ्या टायगर श्रॉफच्या ‘परफेक्ट बॉडी’चे सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 12:58 IST2017-02-19T07:28:39+5:302017-02-19T12:58:39+5:30

टायगर श्रॉफ जरी अद्याप अभिनेता म्हणून आपले स्थान निर्माण करू शकला नसेल परंतु एक अ‍ॅक्शन व डान्सिंग स्टार अशी ...

FITNESS FREAK: Know Tiger Shroff's 'Perfect Body' Secret | FITNESS FREAK: जाणून घ्या टायगर श्रॉफच्या ‘परफेक्ट बॉडी’चे सिक्रेट

FITNESS FREAK: जाणून घ्या टायगर श्रॉफच्या ‘परफेक्ट बॉडी’चे सिक्रेट

यगर श्रॉफ जरी अद्याप अभिनेता म्हणून आपले स्थान निर्माण करू शकला नसेल परंतु एक अ‍ॅक्शन व डान्सिंग स्टार अशी ओळख निर्माण करण्यात तो यशस्वी झाला आहे. त्याची परफेक्ट शेपमध्ये असलेली बॉडी आणि जिम्नॅस्टिक कौशल्य पाहून सर्वच जण आश्चर्यचकित होऊन जातात.

पण तुम्हाला माहित आहे का की, त्याच्या अशा फिटनेसचे रहस्य काय आहे? फिट राहण्यासाठी तो नेमके काय करतो? हे जाणून घेण्याची तुम्हाला नक्कीच उत्सकुता असणार. हो ना?

तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याच्या ‘परफेक्ट बॉडी’चे सिक्रेट. टायगरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नजर फिरवली की लक्षात येईल तो आपल्या बॉडीवर किती मेहनत घेतो. त्यासाठी त्याला आठ जणांची टीम मदत करते. हे आठ लोक टायगरच्या व्यायामाचे वेळापत्रक, डाएट प्लॅन बनवून त्याचे तंतोतंत पालन करवून घेण्याचे काम करतात. त्यामध्ये मग कोणी जिम्नॅस्टिक प्रशिक्षक आहे तर कोणी डाएट एक्सपर्ट आहे.

Tiger fit team

नुकतेच टायगरने या टीमसोबत एक फोटो शेअर केला. त्याचा फिटनेस ट्रेनर आणि न्युट्रिशनिस्ट नितेश शर्मा ने सांगितले की, टागयर व्यायामाच्या बाबतीत फार शिस्तबद्ध आहे. तो कधीच व्यायाम चुकवत नाही. डाएट तर तो जातीने फॉलो करतो. कधी कधी आम्हालाच त्याला ब्रेक घे म्हणून सांगावे लागते.

टागयर म्हणतो की, आपण काय खातो याचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे मी आहाराच्याबाबतीत फार अलर्ट राहतो. मी जर एक आइसक्रीम खाल्ली तर त्यामुळे माझ्या शरीरात गेलेल्या कॅलरीज् बर्न करण्यासाठी मी एक तास पळतो. तसेच दिवसातून किमान दोन तास तरी मी डान्स करतो.

यावरून तुम्हाला लक्षात आले असेल की, त्याच्या डान्सिंग आणि फिटनेसच्या मागे काय रहस्य असेल ते.

ALSO READ: ​​‘मुन्ना मायकल’मधील टायगर श्रॉफचा रापचिक अंदाज

Web Title: FITNESS FREAK: Know Tiger Shroff's 'Perfect Body' Secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.