First Time : ‘या’ चित्रपटात पाकिस्तानी विवाहित महिलेच्या भूमिकेत दिसेल आलिया भट्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 18:47 IST2017-06-23T13:17:45+5:302017-06-23T18:47:45+5:30
‘डिअर जिंदगी’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारणारी बबली गर्ल आलिया भट्ट आता नव्या रूपात पडद्यावर ...

First Time : ‘या’ चित्रपटात पाकिस्तानी विवाहित महिलेच्या भूमिकेत दिसेल आलिया भट्ट!
‘ िअर जिंदगी’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारणारी बबली गर्ल आलिया भट्ट आता नव्या रूपात पडद्यावर झळकणार आहे. तिने मेघा गुलजार यांच्या आगामी ‘राजी’ या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली असून, यामध्ये ती एका काश्मिरी महिलेची भूमिका साकारणार आहे. या महिलेचा पती पाकिस्तानी आर्मी आॅफिसर असतो. पहिल्यांदाच आलिया पाकिस्तानी विवाहित महिलेची भूमिका साकारत असल्याने तिच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी उत्सुकता लागली नसेल तरच नवल.
वास्तविक आलिया ‘डिअर जिंदगी’ आणि ‘ब्रदीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटांच्या यशानंतर सुटीवर गेली होती. मात्र आता ती कामाकडे वळाली असून, ‘राजी’ चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव वेगळेच होते. परंतु आता ‘राजी’ असे नाव ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात आलिया एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. दरम्यान, चित्रपटात पाकिस्तानी आर्मी आॅफिसरची भूमिका ‘मसान’ आणि रमन राघव’मधून प्रसिद्ध झालेला विक्की कौशल साकारणार आहे. हा एक रोमांचक चित्रपट असेल.
![]()
खरं तर आतापर्यंत आलियाने नटखट बबली टाइपच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र ती पहिल्यांदाच एका विवाहित महिलेची भूमिका साकारणार असून, पाकिस्तानी नवरीच्या भूमिकेत ती झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग तीन शहरांमध्ये होणार आहे. पंजाब, काश्मीर आणि मुंबई. असे म्हटले जात आहे की, या वर्षाच्या अखेरपर्यंत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले जाईल. मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून, इंडस्ट्रीमध्ये हे एक मोठे नाव आहे.
आतापर्यंत मेघना यांनी ‘तलवार’ आणि ‘जस्ट मॅरिड’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, तर जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शन या चित्रपटाला प्रोड्यूस करणार आहे. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटात आलियाचा अवतार खूपच सरळ सभ्य घरगुती महिलेचा असेल. शिवाय आतापर्यंत तिने साकारलेल्या भूमिकांच्या अगदीच विपरीत तिची ही भूमिका असेल.